जळगाव : महाराष्ट्र झोपडपट्टीदादा कायद्यांतर्गत (एमपीडीए) नोव्हेंबर २०२२ पासून आजपर्यंत गंभीर गुन्हे दाखल असलेल्या जिल्ह्यातील २३ गुन्हेगारांवर नागपूर, अमरावती, ठाणे, नाशिक, येरवडा व कोल्हापूर या मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याबाबतची कारवाई जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यातील दोन जणांवर नुकतीच महसूल प्रशासनाकडून महाराष्ट्र झोपडपट्टीदादा कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी याबाबतचे आदेश दिले. निखिल ऊर्फ पिया कुडे (२४, रा. एम. जे.नगर, चाळीसगाव) व शेख चाँद शेख हमीद (३८, रा. दीनदयालनगर, जामनेर रोड, भुसावळ) अशी दोघांची नावे आहेत. निखिल हा २०१८ पासून चाळीसगाव तालुक्यात विनापरवाना वाळूची चोरी करून विक्री करीत होता. त्याच्यावर वाळूचोरीचे पाच गुन्हे दाखल होते. तसेच शेख चाँद शेख हमीद हा २०१५ पासून भुसावळ शहरात साथीदारांसह खून करणे, जबरी चोरी करणे, अनैतिक देह व्यापार करणे, सरकारी कर्मचार्‍यांवर हल्ला करणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणे, फसवणूक करणे, विनापरवाना शस्त्र बाळगणे अशा विविध प्रकारचे अकरा गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेला आहे.

हेही वाचा… सिटीलिंक बस सेवा पुन्हा ठप्प, नाशिककरांचे हाल

हेही वाचा… १०५ आरोग्यवर्धिनी केंद्रांची जागा निश्चिती वादात, आमदार निधीतून उभारलेल्या वास्तू मनपाकडून परस्पर ताब्यात

दोघांवर महाराष्ट्र झोपडपट्टी कायद्यांतर्गत कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षकांनी सादर केलेल्या प्रस्तावास जिल्हा दंडाधिकारी मित्तल यांनी मंजुरी दिली. दोघांविरुद्ध एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. निखिल याला कोल्हापूर येथे, तर शेख चाँद शेख हमीद याला नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In jalgaon district in nine months 23 criminals arrested asj
Show comments