जळगाव : जिल्ह्यातील महिला मतदारांची संख्या पुरुषांच्या तुलनेत वाढली असून, २७ ऑक्टोबर ते २४ डिसेंबर या दोन महिन्यांत जिल्ह्यात महिला मतदारांमध्ये २२, ६८१ ने वाढ झाली आहे. आता जिल्ह्यात १६ लाख ७९ हजार ७६७ मतदार झाले आहेत. याच काळात पुरुष मतदारांमध्ये ४४ हजार २८० ने वाढ झाली आहे. पुरुष मतदारांमागे महिला मतदारांची सरासरीत चारने वाढ होत ९२१ वरून ९२५ इतकी सरासरी झाली आहे. भुसावळ, जळगाव शहर, एरंडोल, चाळीसगाव व जामनेरमध्ये महिला मतदार सर्वाधिक वाढले आहेत. जिल्हा निवडणूक विभागाने मतदार नोंदणीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे जिल्ह्यातील महिला मतदारांची संख्या पुरूषांच्या तुलनेत वाढली आहे. जिल्ह्यात १६ लाख ५७ हजार ७६ महिला मतदारसंख्या होती. २७ ऑक्टोबर ते २४ डिसेंबर या दोन महिन्यांतील विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण मतदार नोंदणी कार्यक्रमातील आकडेवारीनुसार जिल्ह्यात मतदारसंख्या वाढ झाली आहे.

हेही वाचा : “भाजप अयोध्येत रामचरणी तर, ठाकरे गट रामभूमीत”, संजय राऊतांचे विधान

Tejaswini Bhavan in Akola built with contributions from mahila bachat gat and Sadhan Kendra
अकोला : बचत गटातील महिलांच्या योगदानातून ‘तेजस्विनी’ महाराष्ट्रातील एकमेव पथदर्शी उपक्रम
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Counseling center for victimized women in Thane district
ठाणे जिल्ह्यात पीडित महिलांसाठी समुपदेशन केंद्र
more than 1700 retirees people in nashik benefit from DLC scheme of Postal Department
सेवानिवृत्तवेतन धारकांच्या मदतीला टपाल विभाग, जिल्ह्यात १७०० पेक्षा अधिक जणांना डीएलसी योजनेचा लाभ
sex ratio of birth in nashik municipal corporation
जिल्ह्यात लिंगोत्तर प्रमाणात घट; लिंग चाचणीची दक्षता समिती बैठकीत साशंकता
mhada launch special campaign for sale of 11176 houses on first come first serve from 2nd december
म्हाडाच्या विशेष मोहिमेला अखेर चांगला प्रतिसाद; ५५०० जणांकडून घरासाठी चौकशी, प्रत्यक्षात २५० जणांनी अनामत रक्कमेसह अर्ज केले दाखल
Scrutiny of all applications of beneficiaries of the Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana  Mumbai news
लाखो बहिणी नावडत्या; ‘लाडकी बहीण’ योजनेच्या सर्व अर्जांची छाननी,वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आदिती तटकरेंची घोषणा
markadwadi women angry
Markadwadi : “मारकडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वणवा पेटला पाहिजे”, शरद पवारांसमोरच महिलांनी एल्गार पुकारला!

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी गेल्या काही महिन्यांत महिला मतदारांची संख्या वाढविण्यासाठी विविध उपक्रम व शिबिरांचे आयोजन केले होते. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार जळगाव शहरात २, ७९२, भुसावळ २, ५२८, एरंडोल २, २२४, चाळीसगाव २, ३२२ आणि जामनेर शहरात २, २१८ महिला मतदार वाढले आहेत. त्याखालोखाल चोपडा, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, पाचोरा व मुक्ताईनगर या मतदारसंघांचा क्रमांक लागतो. जिल्ह्यात दोन आणि तीन डिसेंबरला तृतीयपंथीयांसाठी मतदार नोंदणीची विशेष शिबिरे घेण्यात आली. यामुळे तृतीयपंथीय मतदारांची संख्याही आठने वाढली आहे. पाच जानेवारी २०२३ रोजी जिल्ह्यात १२३ तृतीयपंथीय मतदार होते. आता १३१ तृतीयपंथीय मतदार आहेत. जिल्ह्यात भुसावळ, जळगाव शहर व चाळीसगावमध्ये सर्वाधिक तृतीयपंथीय मतदार आहेत.

हेही वाचा : नाशिक : सप्तश्रृंग गडावर भाविकांच्या वाहनाचा पेट

“राज्यात नऊ डिसेंबरला मतदार नोंदणीची मुदत संपली. मात्र, निवडणूक आयोगाने नऊ डिसेंबरनंतरही मतदार नोंदणीची संधी दिली आहे. यासाठी अर्ज ऑनलाइन, ऑफलाइन भरता येणार आहेत. तेव्हा जास्तीत जास्त नवमतदारांनी ऑफलाइन किंवा व्होटर रजिस्टर अॅपच्या मदतीने लवकरात लवकर नोंदणी करावी.” – आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, जळगाव)

Story img Loader