जळगाव : जिल्ह्यातील महिला मतदारांची संख्या पुरुषांच्या तुलनेत वाढली असून, २७ ऑक्टोबर ते २४ डिसेंबर या दोन महिन्यांत जिल्ह्यात महिला मतदारांमध्ये २२, ६८१ ने वाढ झाली आहे. आता जिल्ह्यात १६ लाख ७९ हजार ७६७ मतदार झाले आहेत. याच काळात पुरुष मतदारांमध्ये ४४ हजार २८० ने वाढ झाली आहे. पुरुष मतदारांमागे महिला मतदारांची सरासरीत चारने वाढ होत ९२१ वरून ९२५ इतकी सरासरी झाली आहे. भुसावळ, जळगाव शहर, एरंडोल, चाळीसगाव व जामनेरमध्ये महिला मतदार सर्वाधिक वाढले आहेत. जिल्हा निवडणूक विभागाने मतदार नोंदणीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे जिल्ह्यातील महिला मतदारांची संख्या पुरूषांच्या तुलनेत वाढली आहे. जिल्ह्यात १६ लाख ५७ हजार ७६ महिला मतदारसंख्या होती. २७ ऑक्टोबर ते २४ डिसेंबर या दोन महिन्यांतील विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण मतदार नोंदणी कार्यक्रमातील आकडेवारीनुसार जिल्ह्यात मतदारसंख्या वाढ झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा