जळगाव : जिल्ह्यातील पारोळा शहरापासून जवळच राष्ट्रीय महामार्गावरील म्हसवे फाट्यावर दोन भरधाव मोटारींची समोरासमोर धडक झाल्याने सुरत येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. धडक देणाऱ्या मोटारीतील नाशिकचे चार जण जखमी झाले आहेत. सुरत शहरात किराणा व्यवसाय करणारे सुधीर पाटील (४७) हे पत्नी ज्योती (४२) यांच्यासह पारोळा तालुक्यातील लोणी येथे पुतणीच्या लग्न कार्यासाठी मोटारीने येत होते. पारोळा शहर ओलांडून म्हसवे फाट्यावरून लोणीला जाणाऱ्या रस्त्याकडे वळत असतानाच त्यांच्या मोटारीला सोमवारी सायंकाळी जळगावहून पारोळ्याकडे येणाऱ्या भरधाव मोटारीने धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, पाटील दाम्पत्याच्या मोटारीचा चुराडा झाला. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. समोरून धडक देणाऱ्या मोटारीतील शिरीष लढ्ढा (४०), उमेश लहाने (४२), चालक प्रवीण तागड आणि मिरज चांदे (सर्व रा.नाशिक) हे जखमी झाले.

हेही वाचा : निवडणुकीनंतर रस्त्यांवरील खड्डे पुन्हा ऐरणीवर, मनसेने इशारा देताच मनपाची तक्रार निवारण यंत्रणा

Image Of Accident
Road Accident Deaths : भारतात रस्ते अपघातात दररोज होतो ४६२ लोकांचा मृत्यू, धक्कादायक आकडेवारी समोर
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
truck vandalism by bikers in pune
दुचाकी नीट चालव म्हटल्याने ट्रकची तोडफोड
in pune one killed and one injured in rickshaw-dumper collision
पुणे : रिक्षा-डंपरच्या धडकेत एक ठार, एक जखमी
accident with Cattle smuggling truck 35 animals killed
गोवंश तस्करी करणाऱ्या ट्रकला अपघात… ३५ जनावरे दगावली…
Buldhana, Speeding car hits a vehicle, car ,
बुलढाणा : भरधाव कार वाहनावर आदळली, एक जागीच ठार, दोघे गंभीर…
Container Truck Collides With Multiple Vehicles near the khambatki tunnel
खंबाटकी बोगद्याजवळ कंटेनर, टँकरसह तीन मोटारींचा अपघात; जिवीतहानी टळली, मोटारीचे मोठे नुकसान
Hinjewadi two girls dead marathi news
Video : हिंजवडीत सिमेंट मिक्सरच्या अपघातात दोन तरुणींचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद

परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढले. जखमींना पारोळा शहरातील कुटीर रुग्णालयात दाखल केले. पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातामुळे संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी समांतर रस्त्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. जोपर्यंत समांतर रस्त्याचे काम करण्यासंदर्भात ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. मात्र, पोलिसांनी समजूत घातल्यानंतर आंदोलकांनी माघार घेतली.

Story img Loader