जळगाव : राज्यातील विविध जिल्ह्यांतून, तसेच गुजरातमधून दुचाकी लांबविणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला आहे. या टोळीतील मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या असून, त्याच्याकडून सुमारे सव्वातीन लाखांच्या आठ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. पुढील कारवाईसाठी त्याला जामनेर येथील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. संतोष ऊर्फ शेरा इंगोले (रा. पांगरी कुटे, ता. मालेगाव जहाँगीर, वाशिम) असे संशयिताचे नाव आहे. यापूर्वी जिल्ह्यातील चौघा संशयितांना अटक झाली आहे.

राज्यातील बुलडाणा, वाशिम, अकोला आदी जिल्ह्यांसह गुजरातमधून दुचाकी लांबवून त्यांची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला आहे. यात ३० ऑगस्टला सुनील भिल (रा. पिंप्री, ता. एरंडोल), खुशाल ऊर्फ भय्या पाटील, गोविंदा कोळी (दोन्ही रा. नागदुली, ता. एरंडोल) आणि हर्षल राजपूत (रा. मोहाडी, ता. पाचोरा) या संशयितांना चोरीच्या १६ दुचाकींसह अटक केली होती. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार संतोष इंगोले हा फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याच्या मागावर होते.

Damage to crops due to rain in Solapur district
सोलापूर जिल्ह्यात पावसाने पिकांचे नुकसान; विमा कंपनीकडून सव्वा लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
What is the mystery of the sound coming from the forest in Nandurbar district
नंदुरबार जिल्ह्यातील जंगलातून येणाऱ्या आवाजाचे गूढ काय?
tiger near Yavatmal town, tiger, Yavatmal,
सावधान ! यवतमाळ शहराजवळ पट्टेदार वाघ फिरतोय
Chandrapur Sudhir mungantiwar marathi news
नागपूर : वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर वनमंत्री म्हणतात, “उपाययोजना…”
Heavy rain Maharashtra, agricultural Maharashtra,
आठवडाभर राज्यात सर्वदूर दमदार सरी? ऐन सुगीत शेतीमाल मातीमोल होणार?
senior officials of railways to provide more than 60 rakes twice for onion transport
नाशिक : कांदा देशभरात पाठविण्यासाठी यंदा दुप्पट रेक, व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार रेल्वेची तयारी
illegal weapons smuggling in border areas of Buldhana district and Madhya Pradesh
बुलढाणा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात शस्त्र तस्करी उघड

हेही वाचा : धुळे लोकसभा मतदार संघात काँग्रेस प्रबळ, मनपा निवडणुकीत मविआ एकत्र; कुणाल पाटील यांचा दावा

बुधवारी इंगोले हा जळगाव शहरात दुचाकी विकण्यासाठी येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांना मिळाली. त्यानुसार पथकाने शहरातील अजिंठा चौफुली परिसरात सापळा रचत संशयित इंगोलेच्या मुसक्या आवळल्या. त्याने दुचाकी लांबविल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीच्या सुमारे तीन लाख २० हजारांच्या आठ दुचाकी हस्तगत केल्या. यापूर्वी १६ आणि आता आठ, अशा २४ दुचाकी टोळीकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. पुढील कारवाईसाठी संशयित इंगोलेला जामनेर येथील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.