जळगाव : ट्रॅक्टरचोरीचा तपास करीत असताना यावल येथील पोलिसांना चोरट्यांची मोठी टोळीच हाती लागली असून, १८ संशयितांना अटक करुन १३ दुचाकी हस्तगत केल्या. त्यांपैकी दोन दुचाकी परराज्यातील असून, यामुळे चोरट्यांनी इतर परराज्यांतही चोरीची करामत केल्याचे उघड झाले आहे. यावल येथील कुंभारवाड्यातील अजय पंडित (३०) यांची दुचाकी, तर कुंभार टेकडी भागातील जाकीर हुसेन रस्त्यावरील फुलचंद रामचंद्र यांच्या घरासमोरून ७५ हजारांचे ट्रॅक्टर चोरीस गेले होते. तपास करताना पोलिसांनी शहरातील १८ संशयितांना अटक केली. त्यांनी ३७ दुचाकी व ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली दिली. जळगाव जिल्ह्यातील विविध भागांतून, तसेच सुरत (गुजरात) व अन्य भागातून दुचाकी चोरल्याचे उघड झाले. चोरीच्या १३ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या. दुचाकींची चोरी केल्यानंतर दलालांमार्फत त्यांची विक्री करण्याचा उद्योग शहरातील तरुण करीत होते.

हेही वाचा : समीर भुजबळ नाशिकच्या राजकारणातून बाहेर?

Baba Siddiqui murder case, Five more people arrested,
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी आणखी पाच जणांना अटक, गोळीबार करणाऱ्यांना पिस्तुल पुरवल्याचा आरोप
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
Pune driving opposite direction, driving in the opposite direction,
पुणे : विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या बेशिस्तांवर कडक कारवाई
panvel traffic police
कळंबोली येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलीस सरसावले, पहिल्याच दिवशी रस्ता अडविणाऱ्या चालकांवर सहा फौजदारी गुन्हे दाखल
nagpur farmers in 110 revenue circles not getting proper insurance compensation Statistics Department inquired
यवतमाळ : नुकसान न झालेल्या शेतकऱ्यांना मदत, पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा
Nine official ration shops suspended due to complaints of looting food grains from people shares
‘मापात पाप’ करणाऱ्या शिधावाटप दुकानदारांवर कारवाई
fraud of 23 lakh with young man by showing fear of police action
पोलीस कारवाईची भीती दाखवून तरुणाची २३ लाखांची फसवणूक
no action against officer found guilty in cow distribution scam
बहुचर्चित गायवाटप घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यावर कारवाई नाहीच; लाभार्थी, कर्मचाऱ्यांचे पुन्हा जबाब…

अटक करण्यात आलेल्यांमध्ये हर्षल गजरे (२०), उमेश घारू (४९), विशाल वाणी (३०, रा. फिल्टर हाउस, बोलावल गेट), सुरेश कुंभार (५२), सर्फराज तडवी (२२), संजय भोई (३०), अशरफ ऊर्फ गोलू तडवी (१९), देविदास ऊर्फ साहील बारसे (१६), अर्जुन कुंभार (१९, सर्व रा. बोरावल गेट), रवींद्र कुंभार (२५), आकाश कुंभार (१९, रा. कुंभारवाडा), जावेद खान (२२, रा. बाबानगर), सागर ऊर्फ उमेश सपकाळे (२७, बाहेरपुरा), विनोद कुंभार (२४, गायत्रीनगर), जावेद खान (३९, ख्वाजानगर, यावल), राजेंद्र महाजन (३८, रा. यावल), रवींद्र कोळी (४०, दहिगाव), सलीम तडवी (२४, विरावली) यांचा समावेश आहे. या प्रकरणात एका विधीसंघर्ष बालकास नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात १३ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून, त्यांपैकी सुरत, बर्‍हाणपूर, अमळनेर, व यावल येथील पाच मालकांचा तपशील मिळाला आहे.