जळगाव : ट्रॅक्टरचोरीचा तपास करीत असताना यावल येथील पोलिसांना चोरट्यांची मोठी टोळीच हाती लागली असून, १८ संशयितांना अटक करुन १३ दुचाकी हस्तगत केल्या. त्यांपैकी दोन दुचाकी परराज्यातील असून, यामुळे चोरट्यांनी इतर परराज्यांतही चोरीची करामत केल्याचे उघड झाले आहे. यावल येथील कुंभारवाड्यातील अजय पंडित (३०) यांची दुचाकी, तर कुंभार टेकडी भागातील जाकीर हुसेन रस्त्यावरील फुलचंद रामचंद्र यांच्या घरासमोरून ७५ हजारांचे ट्रॅक्टर चोरीस गेले होते. तपास करताना पोलिसांनी शहरातील १८ संशयितांना अटक केली. त्यांनी ३७ दुचाकी व ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली दिली. जळगाव जिल्ह्यातील विविध भागांतून, तसेच सुरत (गुजरात) व अन्य भागातून दुचाकी चोरल्याचे उघड झाले. चोरीच्या १३ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या. दुचाकींची चोरी केल्यानंतर दलालांमार्फत त्यांची विक्री करण्याचा उद्योग शहरातील तरुण करीत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा