जळगाव : जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आठवडे बाजारात आवक घटल्याने आणि पितृपक्षामुळे भाजीपाल्यांचे भाव कडाडले आहेत. जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील जामनेर तालुक्यातील वाकोद गावाला लागूनच २५ खेडी आहेत. आठवडे बाजारात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव, गलवाडा, पळसखेडे, वरखेडी, गोंदेगाव, शिवना, गोळेगाव, अजिंठा, फर्दापूर, धनवट, तसेच जळगाव जिल्ह्यातील पहूर, पाळधी, सोनाळे, सांगवी, शेंदुर्णी, वडगाव, वडाळी, तोंडापूर आदी गावांतील शेतकरी भाजीपाला आणतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आठवडे बाजारात पहाटे पाच ते सकाळी सात या वेळेत भाजीपाल्यांचा लिलाव होतो, तर सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत बाजार भरतो. दुपारनंतर भाजीपाला पाच ते दहा रुपयांनी स्वस्त होतो. त्यामुळे सायंकाळी बाजारात गर्दी होते. यात महिलांची संख्या लक्षणीय असते. पितृपक्षाचा प्रारंभ झाल्याने पालेभाज्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे भाव वाढले असून, कोथिंबीर २०० रुपये, लसूण २०० रुपये, आले १२० रुपये, फुलकोबी ८० रुपये, शेवगा ८० रुपये प्रतिकिलो दर होते. शिवाय, फळांचीही बाजारात रेलचेल होती. संत्री ३० रुपये, पेरू ५० रुपये याप्रमाणे विकले गेले.

हेही वाचा : संजय राऊत यांच्या विरोधात मालेगावात बदनामीचा खटला, दादा भुसे यांच्यावरील आरोप प्रकरण

भाजीपाल्याचे दर

प्रतिकिलोप्रमाणे दर- वांगी ३० रुपये, शेवगा ८०, भुईमूग शेंगा ६०, भरीत वांगी ४०, टोमॅटो २०, बटाटे ३०, कांदे ३०, लसूण २००, हिरवी मिरची ४०, चवळी ८०, आले १२०, गवार ६०, भेंडी ४०, दोडके ६०, फुलकोबी ८०, पत्ताकोबी ४०, काकडी ४०, देव डांगर (काशीफळ) ३०, चक्री ६०, भोपळा ४०, लिंबू ४०, कोथिंबीर २००, बीट ४०, ओली लाल मिरची ५०, पालक २० रुपये जुडी, आंबटचुका २० रुपये जुडी, पुदिना १० रुपये जुडी, कांदेपात २० रुपये जुडी.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In jalgaon prices of vegetables increased due to pitru paksha 2023 css
Show comments