जळगाव : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत ईव्हीएम यंत्रात घोळ झाल्याने संशयास्पद निकाल लागला आहे. मतदानाच्या व मतमोजणीच्या दिवशी घडलेल्या गैरप्रकाराची चौकशी करावी तसेच मतपत्रिकेवर पुन्हा मतदान घ्यावे, या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ‘ईव्हीएम हटाओ, देश बचाओ’ अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिलेल्या निवेदनात मोर्चेकऱ्यांनी आपली भूमिका मांडली. जळगाव शहर मतदारसंघातील निवडणुकीच्या मतमोजणीवेळी बरेच ईव्हीएम यंत्र चुकीचे आकडे दर्शवित होते. त्यामुळे ईव्हीएम यंत्राच्या आधारे देण्यात आलेल्या निकालास आमची हरकत आहे. सामान्य जनतेने लोकशाहीवर विश्वास ठेवून मतदानाचा हक्क बजावला आहे. मात्र, मतदारांनी प्रामाणिकपणे बजावलेला हक्क व उद्देश ईव्हीएम यंत्राच्या माध्यमातून हिरावून घेण्यात आला आहे. शासन निवडणूक काळात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्नशील असते. त्याकरीता व्यापक जनजागृतीसुद्धा केली जाते. परंतु, ईव्हीएम यंत्राच्या सहाय्याने घेण्यात आलेल्या निवडणुकीमुळे उलट मतदानाची टक्केवारी कमी होण्याची भीती आता निर्माण झाली आहे. जळगाव शहरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी ईव्हीएमवर हरकत घेतल्यानंतरही संबंधित निरीक्षक व अधिकाऱ्यांनी व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यास नकार दिला होता. हे सर्व संशयास्पद असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा :पीक विमा योजनेचे अर्ज भरताना सावळागोँधळ, ग्राहक सेवा केंद्रांवर कारवाईचा इशारा
यावेळी सामाजिक कार्यकर्ती मंगला सोनवणे, शोभा कोळी, काजल कोळी, सरला सपकाळे, अवंताबाई सपकाळे, मनीषा सोनवणे, उर्मिला कोळी, बबलू सपकाळे, निखिल सपकाळे आदी उपस्थित होते.