जळगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा पाडळसरे प्रकल्प २० ते २५ वर्षांपासून अपूर्ण असून, तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी बुधगाव (ता. चोपडा) येथील रहिवासी व पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या तरुण सदस्याने गुडघ्यावर चालून अमळनेर येथील श्री मंगळग्रह देवाला साकडे घातले. यावेळी बैठकीसाठी आलेले मंत्री अनिल पाटील यांना हात जोडत आणि दंडवत घालत त्याने मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्याची विनंती केली.

पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे तरुण सदस्य उर्वेश साळुंखे यांनी पाडळसरे प्रकल्प पूर्णत्वासाठी शनिवारी अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात गुडघ्यावर चालत साकडे घातले. याप्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले, पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी, रणजित शिंदे, रामराव पवार, हिंमत कखरे, निवृत्त मुख्य कार्यकारी अभियंता अशोक पवार, पाडळसे प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार प्रकाश पाटील, नागपूर प्राधिकरणाचे उपसंचालक कपिल पवार, उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेचे कार्यवाह प्रा. विकास पाटील आदींसह पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे सदस्य उपस्थित होते.

Sumit Wankhede Arvi Constituency, Sumit Wankhede,
भाग्य फळफळले! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दोन सचिवही निवडणुकीच्या रिंगणात
29th October 2024 Horoscope Today
Daily Horoscope, 29 October : धनत्रयोदशीला मेष, सिंहसह…
Gadchiroli, Congress Armori, former MLA,
गडचिरोली : आरमोरीत अखेर काँग्रेसने पत्ते उघडले, माजी आमदाराच्या स्वप्नावर पाणी
if Maratha society got cheated file case of fraud says Bipin Chaudhary
“मराठा समाजाला धोका दिल्यास फसवणुकीचा गुन्हा दाखल करा” जरांगेंच्या आवाहनाला…
Hadapsar, nana bhangire, activists on the streets,
नेत्याच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत शिवसैनिक पायी निघाले, वाचा सविस्तर…
Maha Vikas Aghadi Seat Sharing conflict
Nana Patole on Sanjay Raut: ‘संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे नेते’, नाना पटोलेंचं खोचक विधान, तर उद्धव ठाकरे म्हणतात, “तुटेपर्यंत…”
isha foundation case in supreme court DY Chandrachud
Relief for Sadhguru: मुलींना आश्रमात बंदी बनविण्याच्या प्रकरणात सदगुरू जग्गी वासुदेव यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
Jayant Patil Statement About CM Post
Jayant Patil : “मुख्यमंत्री व्हायचं असेल तर खूप उठा-बशा..”, जयंत पाटील यांचं वक्तव्य चर्चेत

हेही वाचा : नाशिक : विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू

साळुंखे यांनी निम्न तापी पाडळसरे प्रकल्प पूर्ण करावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतःच्या रक्ताच्या शाईने निवेदन तयार केले आहे. ते साळुंखे हे स्वत: मुख्यमंत्र्यांना देणार आहेत. यासाठी ते सतत मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधत आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील, चोपड्याच्या आमदार लता सोनवणे यांनाही विनंती अर्ज दिला. मात्र, मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्यासाठी कोणीही लक्ष न देता, शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या पाडळसरे प्रकल्पासाठी राज्यातील सत्ताधारी असलेले जिल्ह्यातील मंत्री, आमदार उदासीन आहेत, असा आरोप साळुंखे यांनी केला आहे. याप्रसंगी माजी आमदार साहेबराव पाटील, स्मिता पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.