जळगाव : सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीतून शेततळ्याचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून कंत्राटदाराची तापी पाटबंधारे विभागाचे तत्कालिन वरिष्ठ अभियंता व्ही. डी. पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संगनमताने‌ सुमारे ४५ लाख रुपयांना फसवणूक केली होती. याप्रकरणी जळगाव जिल्हा न्यायालयाच्या आदेशावरून शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात पाटील यांचेसह कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन व अन्य संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कंत्राटदार अजय बढे यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांची भेट घेऊन तक्रार केली होती. त्यानुसार अधीक्षकांनी सदर तक्रारीची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविली होती. मात्र, या प्रकरणी फक्त दोन जणांविरुद्ध तक्रार करावी, असे अजय बढे यांना कळविण्यात आले होते. त्यामुळे बढे यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या निर्णयाविरुद्ध जळगावच्या कनिष्ठ न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने सर्व पुरावे लक्षात घेवून व्ही.डी.पाटील, कार्यकारी ‌अभियंता गोकुळ‌ ण महाजन यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध निवृत्त वरिष्ठ अभियंता पाटील व इतरांनी जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणी अपर जिल्हा न्यायाधीश एस.आर. पवार यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवला.

हेही वाचा…सिंहस्थासाठी मनपा, त्र्यंबक नगरपालिकेसह इतर विभागांचे आराखडे सादर

निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही.डी पाटील, कार्यकारी अभियंता गोकुळ‌ महाजन आणि सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश रामानंदनगर पोलिसांना दिले. त्यानुसार पाटील, महाजन यांच्यासह गोल्ड रिव्हर कंपनीचे (मुंबई) सूर्यवीर चौहान, सनदी लेखापाल सुहास भट (मुंबई), व्ही. के. जैन, पवन कोलते, ललित चौधरी, पंकज नेमाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In jalgoan engineer frauded rs 45 lakh by luring farm work from csr fund sud 02