नाशिक : विजेचा धक्का लागल्याने मालेगाव येथे २२ वर्षाच्या कामगाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी रमजानपुरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा : अवैध गौण खनिज कारवाईतून सात महिन्यांत सहा कोटींची कमाई, जळगाव जिल्ह्यात ८२ गुन्हे
मालेगाव येथील अक्षय जामकर हा आयशानगर येथील कब्रस्थानमागील ठिकाणी काम करत असतांना त्यास विजेचा धक्का लागला. हा प्रकार त्याचा मामा सुनील कलाके यांच्या लक्षात आल्यावर मालेगांव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी अक्षय यास मृत घोषित केले.