मालेगाव : कापड खरेदीसाठी मालेगाव येथील व्यापाऱ्यास दिलेले धनादेश बँकेत न वटल्याने येथील न्यायालयाने मुंबईच्या दोन व्यापाऱ्यांना दोन वर्षे कैद, धनादेश रकमेच्या दुप्पट दंड ठोठावला आहे. मालेगावातील कापड व्यावसायिक फैनी जैन यांनी मुंबई येथील श्यामलाल शर्मा आणि राजू शर्मा यांच्या कंपनीला कापडाची विक्री केली होती. या व्यवहारासाठी उभय व्यापाऱ्यांनी जैन यांना ११ लाख ८१ हजार ११२ रुपयांचे एकूण पाच धनादेश दिले होते. मात्र खरेदीदार व्यापाऱ्यांनी देय रक्कम थांबविल्याच्या कारणावरून जैन यांना दिलेले धनादेश बँकेत वटू शकले नव्हते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराजनगरात जीर्ण तीन मजली इमारत कोसळली; दोघींपैकी एकीला बाहेर काढण्यात यश; बचावकार्य सुरु

या संदर्भात जैन यांनी ॲड. प्रदीप मर्चंट, ॲड. निमिष मर्चंट यांच्यामार्फत नोटीस पाठवूनही संबंधितांनी व्यवहाराची रक्कम दिली नाही. त्यामुळे येथील न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर अतिरिक्त न्यायदंडाधिकारी तेजवंतसिंघ संधू यांनी संबंधित व्यापाऱ्यांना दोन वर्षाची कैद व धनादेश रकमेच्या दुप्पट म्हणजे २३ लाख ६२ हजार २२४ रुपयांवर दरसाल नऊ टक्के या दराने दंड ठोठावला आहे. तसेच दंडाची रक्कम वसुल झाल्यानंतर तक्रारदार जैन यांना २३ लाख ६२ हजार २२४ रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.