मालेगाव : दिवाळीची सर्वत्र धामधूम सुरू असताना लक्ष्मीपूजनच्या दिवशी सलमान खानच्या चाहत्यांनी येथील मोहन चित्रपटगृहात थेट फटाक्यांची आतषबाजी करत गोंधळ घातला. जवळपास १० मिनिटे विविध फटाके उडवले गेले. या घटनाक्रमामुळे चित्रपटाचा खेळ मध्येच बंद करावा लागला. विशेष म्हणजे, छावणी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला. मालेगाव शहरात सलमान खान व शाहरुख खानच्या चाहत्यांची मोठी संख्या आहे. संबंधितांचे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यास चाहत्यांची चांगलीच गर्दी होते. उत्साहाच्या भरात त्यांच्याकडून अनेकदा गोंधळ घातल्याची उदाहरणे आहेत.

रविवारी रात्री मोहन चित्रपटगृहात त्याची पुनरावृत्ती झाली. लक्ष्मी पूजनच्या दिवशी म्हणजे रविवारी रात्री या चित्रपटगृहात सलमान खानच्या टायगर तीन या चित्रपटाचा खेळ होता. नेहमीप्रमाणे चाहत्यांची गर्दी झाली होती. चित्रपट सुरू झाल्यानंतर काही चाहत्यांनी वेगवेगळे फटाके फोडण्यास सुरुवात केली. रॉकेट्सही सोडले गेले. यामुळे अन्य प्रेक्षकांची धांदल उडाली. जवळपास १० मिनिटे बॉम्ब, रॉकेट्स, फुलझाड व तत्सम फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. बाल्कनीतील प्रेक्षक शिट्या वाजवून नाचत त्याचे समर्थन करीत होते. या घटनाक्रमाची चित्रफित समाजमाध्यमांवर पसरली आहे.

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Bhool Bhulaiyaa 3 Singham again on OTT
सिंघम अगेन व भूल भुलैया थिएटरनंतर एकाच दिवशी OTT वर रिलीज होणार, कुठे येणार पाहता? वाचा
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Navri Mile Hitlarla
“तुला माझ्यासाठी…”, सुनांच्या हट्टासाठी एजेने दिली शिक्षा; लीलाचा आनंद मात्र गगनात मावेना, पाहा प्रोमो
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार

हेही वाचा : ऐन दिवाळीत हवेतील प्रदूषण मापनात अडथळे; फिरत्या हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रापुढे वीज अनुपलब्धतेचे संकट

या घटनेची माहिती मिळताच रात्री साडेअकरा वाजता पोलीस चित्रपटगृहात दाखल झाले. काही वेळात अग्निशमन दलाचा बंबही पोहोचला. गर्दीत संशयितांना ओळखणे अवघड झाले होते. या गोंधळामुळे काही प्रेक्षक आधीच बाहेर पडले होते. हुल्लडबाजी टाळण्यासाठी अखेर खेळ बंद करण्यात आला. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अद्याप कुठलीही नोंद झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, याच चित्रपटगृहात गेल्या महिन्यात शाहरुख खानच्या चित्रपटावेळी अशीच हुल्लडबाजी प्रेक्षकांनी केली होती.

Story img Loader