मनमाड : जिल्हा पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक आणि मनमाड पोलीस यांच्या संयुक्त पथकाने शहरातील कीर्तीनगर भागात छापा टाकून घरगुती गॅस सिलिंडरचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई केली. या छाप्यात गॅस भरण्यासाठी वापरली जाणारी इलेक्ट्रॉनिक मोटार पंप, वजन काटा व हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे ४९ सिलिंडर आणि चारचाकी रिक्षा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हेही वाचा : नायगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी
कीर्ती नगर भागात एका ठिकाणी घरगुती वापराच्या सिलेंडरमधून रिक्षामध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरून काळा बाजार केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथक व मनमाड पोलीसांच्या पथकाने संयुक्त कारवाई केली व उपरोक्त माल जप्त केला. यातील संशयित फरार असून पोलीस पुढील कारवाई करत आहे. घरगुती वापराच्या सिलेंडरमधून बेकायदेशीररित्या गॅस भरत असतांना पोलिसांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. सिलिंडर भरलेली चारचाकी व एक रिक्षाही जप्त करण्यात आली.