मनमाड : माजी आमदार तथा मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा पणन संचालकांकडे देत असल्याचे बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्याचबरोबर मराठा आरक्षणास विरोध करणारे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचीही साथ सोडत असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसला पवार यांनी सोडचिठ्ठी दिली.

मनमाड बाजार समितीच्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे माजी आमदार संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील पाच माजी आमदारांच्या परिवर्तन पॅनलने १५ पैकी १२ जागांवर विजय संपादन करीत विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलचा पराभव केला होता. त्यावेळी संजय पवार, पंकज भुजबळ, काँग्रेसचे अनिल आहेर, ठाकरे गटाचे राजाभाऊ देशमुख आणि जगन्नाथ धात्रक या पाच माजी आमदारांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने निवडणूक लढविली होती. दरम्यानच्या काळात माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता संजय पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडले आहेत. त्यांची पुढील भूमिका काय राहील, हे मात्र गुलदस्त्यात आहे. त्यांच्यासोबत सत्तारूढ आघाडीतील विद्यमान संचालक विठ्ठल आहेर हेही होते.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Prakash Ambedkar, Vanchit Bahujan Aghadi Candidate pune, Vanchit Bahujan Aghadi,
“भाजपचा आरक्षण संपविण्याचा मोठा डाव”, कोणी केला हा गंभीर आरोप ?
Mehkar Assembly constituency shinde shiv sena thackeray shiv sena Siddharth Kharat Sanjay Raimulkar buldhana district
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे-ठाकरे गटांत सामना, संजय रायमूलकर यांची घोडदौड सिद्धार्थ खरात रोखणार?
yogi adityanath criticize congress and mahavikas aghadi
योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”
Manoj Jarange Patil onMaharashtra Assembly Election 2024
मनोज जरांगे पाटील कुणाच्या बाजूने? उमेदवार मागे घेण्याचे कारण सांगताना म्हणाले…
amit shah remark on muslim reservation in ghatkopar
मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही; केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे परखड प्रतिपादन

हेही वाचा : तहसीलदार डाॅ. राजश्री अहिरराव यांचा राजीनामा, राजकीय क्षेत्रात उतरण्याची चिन्हे

सभापती पदावरून चार ते पाच महिन्यात आपल्याला एकही चांगले काम करू दिले गेले नाही. काही ना काही कारण काढून सत्तारूढ आघाडीतीलच संचालकांनी विकासकामांमध्ये खो घातला. शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास अडथळा निर्माण केला, असाही आरोप पवार यांनी केला. काही विकास कामांसाठी आपण विद्यमान शिंदे सेनेचे आमदार सुहास कांदे यांच्याकडे गेलो असताना अकारण संशय घेण्यात आला. वास्तविक आमदार कांदे यांना भेटण्यामागे कोणतेही राजकीय कारण नाही. दुसरीकडे भुजबळ हे तर भाजप-शिंदे सेनेसोबतच्या मंत्रिमंडळात प्रत्यक्ष काम करीत आहेत. त्यांना अशी का विचारणा होत नाही, असाही प्रश्न पवार यांनी केला. चार-पाच महिन्यांतील बाजार समितीच्या इतिवृत्ताच्या नकला व त्यावर आपल्याच सत्तारूढ महाविकास आघाडीतील सभासदांनी घेतलेले आक्षेप याची सर्व कागदपत्रेच पत्रकारांपुढे सादर केली. आयत्या वेळेत कुठलेही विषय घेण्यात येऊ नयेत. कारण त्यात नियमबाह्य व बेकायदेशीर पध्दतीने चर्चिले न गेलेले विषय घेण्यात आल्याने बाजार समितीचे नुकसान होत असल्याचे सत्तारूढ संचालकांनी म्हटले आहे.

हेही वाचा : लाचप्रकरणी पाटबंधारे अधिकाऱ्यास सक्तमजुरी

गेल्या सहा महिन्यापूर्वी महाविकास आघाडीचे नेतृत्व आपल्याकडे नसते तर बाजार समितीत या पॅनलला बहुमत मिळालेच नसते, अशी वस्तुस्थिती असताना पाच महिन्यांत आम्ही सांगू तेच काम सभापतींनी करावे, असा आग्रह संचालकांनी धरला. कार्यक्रम पत्रिकेवरील विषयांना सातत्याने विरोध केला. त्यामुळे केवळ नामधारी सभापती राहण्यात आपल्याला स्वारस्य नसल्याचेही सभापती पवार यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : “ललित पाटील प्रकरणात चौकशीला सहकार्य करु”, विनायक पांडे यांचे आश्वासन

मराठा आरक्षणास भुजबळांचा विरोध

मंत्री छगन भुजबळ यांचा मराठा आरक्षणास विरोध असल्याचा आरोप करीत आपणास त्यांच्याबरोबर काम करण्यात स्वारस्य उरले नसल्याने आपण राष्ट्रवादी पक्षाचीही साथ सोडत असल्याचे संजय पवार यांनी पत्रकारांना सांगितले.