नंदुरबार : महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण; ही तोरणमाळची ओळख आहेच, परंतु त्यापलिकडे निसर्गसौंदर्य, इतिहास, आदिवासी संस्कृती, निसर्गोपचारासह साहसी क्रीडा पर्यटन यासारख्या वैविध्यपूर्ण पर्यटनाच्या मोठ्या संधी असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तोरणमाळ येथे पर्यटन विकास विभाग व वनविभागाच्या वतीने आयोजित आदिवासी पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी डाॅ. गावित बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य रतिलाल नाईक, तोरणमाळचे सरपंच इंदुबाई चौधरी, नगरसेवक संतोष वसईकर, पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका मधुमती सरदेसाई आदी उपस्थित होते.

हेही वाचा : चबुतऱ्याचे काम न झाल्यास आंदोलन; धुळ्यात छत्रपती संभाजीराजे पुतळा समितीचा इशारा

यावेळी डॉ. गावित यांनी, तोरणमाळपासून ते शेवटच्या टोकावरील भादल गावापर्यंत वीज पोहचावी म्हणून ३३ केव्ही उपकेंद्र मंजूर करण्यात आले असल्याचे सांगितले. तोरणमाळ भागातील विविध विकास कामांसाठी ४०० कोटी रुपये मंजूर असून त्यापैकी २०० कोटी रुपये काही दिवसात प्राप्त होतील. तोरणमाळ भागातील उंच शिखर जोडणारे झुलते पूल करावेत, डंकी जम्पिंगची व्यवस्था करावी, बोटिंग व्यवसाय विकसित करावा, अशा विविध कामांना चालना दिल्यास पर्यटन वाढू शकते. त्यादृष्टीने आपला सतत प्रयत्न राहणार आहे, असे मंत्री गावित यांनी सांगितले.

हेही वाचा : मखमलाबाद परिसरात बिबट्याचा वावर; रहिवाशांमध्ये भीती

प्रारंभी तोरणमाळ पर्यटन महोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका मधुमती सरदेसाई यांनी मांडली. महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात कृषीतज्ज्ञ पांडुरंग तावरे यांनी कृषी पर्यटनाची माहिती दिली. आदिवासी नृत्य सादर करणारे पथक, त्या भागात पर्यटनाला आलेले एक दांपत्य, स्ट्रॉबेरीसारखे निराळे कृषी प्रयोग राबवणारे शेतकरी आणि अन्य यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. डॉ. गावित यांनी यावेळी प्रत्येक दालनाला भेट देऊन बचत गटाच्या महिलांशी संवाद साधत विविध योजनांच्या माध्यमातून उद्योग आणि प्रकल्प कसा विकसित करता येईल, याचे मार्गदर्शन केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nandurbar minister of tribal development dr vijaykumar gavit said that will provide tourism opportunities at toranmal hill station css
Show comments