नाशिक : नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा तालुक्यातील देवगुई घाटात बस उलटली. अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी बसचे चालक आणि वाहक जखमी झाले आहेत. अक्कलकुवा आगाराची वडफळी मुक्कामी असणारी बस शनिवारी वडफळीहून अक्कलकुव्याकडे परतत असताना तिचा देवगुई घाटात अपघात झाला. अक्कलकुवा आणि मोलगीला जोडणाऱ्या देवगुई घाटात बस उलटली. बसमध्ये चालक, वाहकासह चार ते पाच प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : नाशिक : अंबुपाडा आश्रमशाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान

या अपघातात चालक आणि वाहक जखमी झाले असून प्रवाशांनाही किरकोळ जखमा झाल्या आहेत. इतका मोठा अपघात झाल्यानंतरही कुठलीही जिवितहानी झाली नाही. बस नेमकी कशामुळे, उलटली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. बस उलटल्याने अक्कलकुवा- मोलगी दरम्यानची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली. सकाळी आठ ते साडे आठच्या दरम्यान हा अपघात झाला. सर्व यंत्रणा अपघातस्थळी त्वरीत रवाना झाल्या.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nandurbar st bus overturned driver conductor injured css