नाशिक : चांदवड तालुक्यात सर्पदंशामुळे ११ वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने सरपटणारे प्राणी दिसण्याचे प्रमाणही वाढले आहे. शेतीची कामे करताना शेतकऱ्यांना अनेक वेळा साप दिसत आहेत.
हेही वाचा : नाशिकमध्ये दुकानाला आग, वरच्या मजल्यावरील रुग्णालय सुरक्षित
चांदवड बाजार समितीजवळ राहणारा गणेश रागपसारे हा बालक मित्राबरोबर खेळत असतांना त्याला साप चावला. त्याच्या तोंडातून फेस निघाल्याने पालकांनी त्याला तातडीने मालेगाव येथील रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.