नाशिक: नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात ब्रेक निकामी (फेल) झालेल्या ट्रेलरने पाच मोटारींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात १३ ते १४ प्रवासी जखमी झाले. या अपघातात पाच गाड्यांचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांचे गस्ती पथक व रुग्णवाहिका मार्गस्थ झाली.

रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नवीन कसारा घाटातील धबधबा पॉइंटजवळ ट्रेलरचा ब्रेक निकामी झाल्याने समोरील मारुती सियाझ, ह्युंदाई, किया, मारुती बलेनो, मारुती स्विफ्ट या पाच मोटारींना धडक देत तो उलटला. या अपघातात विनीत मेहता, दिव्या मेहता, जितेश पिटाडिया, फाल्गुनी पिटाडिया हे जखमी झाले. अन्य तीन जखमींच्या नावांची स्पष्टता झालेली नाही. सर्व जखमींना नरेंद्र महाराज रुग्णवाहिकेचे चालक कैलास गतीर व १०८ रुग्णवाहिकेतून कसारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर गंभीर रुग्णांवर प्राथमिक उपचार करून त्यांना खर्डी येथील जिल्हा उपरुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातग्रस्त मोटार खासगी क्रेनच्या मदतीने बाजूला करून महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

up firing news, marathi news, bahraich violence
बहराइच हिंसाचार : गोपाल मिश्रा हत्या प्रकरणातील आरोपींवर पोलिसांचा गोळीबार; नेपाळ सीमेवर झालेल्या चकमकीत दोघे जखमी
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
baba siddique murder case
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण: जुहू बीचवर काढलेल्या ‘त्या’ फोटोमुळे आरोपी अडकले; तिसऱ्या फरार साथीदाराचीही ओळख पटली!
Pune, young man murder Dhayari, Dhayari,
पुणे : ताटात हात घातल्याने तरुणाचा खून, धायरीतील घटना; पाचजणांविरुद्ध गुन्हा
Traffic altered due to Dussehra Mela and Devi Visarjan at Shivaji Park
विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीच्या धडकेत पोलीस जखमी
Decision regarding hut buyer under Abhay Yojana of Maharashtra State Government Mumbai news
पात्र झोपडीधारकाकडून खरेदी केलेल्यांना दिलासा; राज्य सरकारची अभय योजना
pune young girl kidnapped
पुणे: मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचे बोपदेव घाटातून अपहरण, विनयभंग केल्याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा
Pune heavy rain, Pimpri Chinchwad rain,
पुणे, पिंपरी चिंचवडसह उपनगराला जोरदार पावसाने झोडपले

हेही वाचा : नाशिक : रविशंकर मार्गावरील नाल्यावर जाळ्या टाकण्यास विरोध

इगतपुरी तालुक्यात तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने कसारा घाटात ठिकठिकाणी धबधबे तयार झाले आहेत. या धबधब्याखाली भिजण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी प्रवासी वाहने मध्येच उभे करीत असल्याने अपघात होत आहेत. कसारा घाटातील ब्रेक निकामी होण्याच्या स्थळाजवळून (ब्रेक फेल पाँईट) पाच ते सहा वाहने रस्त्याने जात असतांना ब्रेक निकामी झालेल्या ट्रेलरने त्यांना धडक दिल्याने हा अपघात झाला.

हेही वाचा : इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग केंद्रांचा विस्तार, नाशिक शहरात आणखी नऊ केंद्रांना मान्यता

घाटात उपाययोजनांची गरज

नवीन कसारा घाटात फेसाळणाऱ्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी शेकडो पर्यटक, चालक या ठिकाणी गाड्या थांबवतात अथवा गती कमी करून छायाचित्र काढत असतात. तसेच उंट दरीजवळ देखील मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर उभी करून पर्यटक छायाचित्रणासाठी जातात. परिणामी दोन्ही धोक्याच्या ठिकाणी उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.