नाशिक: शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींना न्यायालयाने २० वर्ष सश्रम कारावास आणि ४५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. या निकालाची माहिती अभियोग कक्षाकडून देण्यात आली. गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सप्टेंबर २०१९ ते डिसेंबर २०२० या कालावधीत हा गुन्हा घडला होता. या गुन्ह्यात वसंत गांगोडे (३५, शिवाजीनगर, सातपूर) आणि हरिदास राऊत उर्फ सोनू (२०, देवडोंगरा, त्र्यंबकेश्वर) या आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले. अल्पवयीन मुलगी प्रसाधनगृहात जात असताना बळजबरीने पाठोपाठ शिरून वसंत गांगोडेने दरवाजाची कडी आतून बंद करीत अत्याचार केले. दुसरा आरोपी पीडितेच्या शाळेत शिक्षण घेत होता. त्याने पीडितेच्या घरात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे पीडिता गरोदर झाली. याबाबत कुठे वाच्यता केल्यास आरोपीने जिवे मारण्याची धमकी दिली. १० दिवसांनी आरोपीने पुन्हा असाच प्रकार केला. या प्रकरणी दोघांविरुध्द बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : नाशिक: शेततळ्यात बुडून भावंडांचा मृत्यू

life sentence prisoner escapes from yerawada jail pune
येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Mira Road Riot Case, Bail to 14 Muslim Youths,
मीरा रोड दंगल प्रकरण : १४ मुस्लिम तरुणांना उच्च न्यायालयाकडून जामीन
minor girl sexually assaulted Vadgaon Maval Sessions Court sentenced accused to 20 years of hard labor and fine
पिंपरी : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला सक्तमजुरी
chief officer of mhada nashik board suspended
म्हाडाच्या नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी निलंबित; २० टक्के योजनेतील घरे मिळविण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका
number of ST bus accidents increased in Nashik division
नाशिक विभागात एसटी अपघातांचा उंचावता आलेख; नऊ महिन्यांत बसचे १२० अपघात, २२ जणांचा मृत्यू

या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांनी करून आरोपींविरुध्द सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होती. न्यायालयाने तक्रारदार, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष, तपासणी अमलदारांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुराव्याला अनुसरुन विविध कलमांन्वये आरोपींना शिक्षा सुनावली. वसंत गोंगोडेला बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील तीन कलमांन्वये प्रत्येकी २० वर्ष सश्रम कारावास आणि प्रत्येकी १० हजार रुपये आणि अन्य एका कलमाद्वारे एक वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपयांची शिक्षा सुनावली. तर हरिदास राऊतला २० वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त अभियोक्ता म्हणून सुलभा सांगळे यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाईक रिना आहेर, विजय पाटील आणि उपनिरीक्षक इकबाल पिरजादे यांनी या गुन्ह्यात शिक्षा लागण्याच्या दृष्टीने वेळोवेळी पाठपुरावा केला.

Story img Loader