नाशिक: शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींना न्यायालयाने २० वर्ष सश्रम कारावास आणि ४५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. या निकालाची माहिती अभियोग कक्षाकडून देण्यात आली. गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सप्टेंबर २०१९ ते डिसेंबर २०२० या कालावधीत हा गुन्हा घडला होता. या गुन्ह्यात वसंत गांगोडे (३५, शिवाजीनगर, सातपूर) आणि हरिदास राऊत उर्फ सोनू (२०, देवडोंगरा, त्र्यंबकेश्वर) या आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले. अल्पवयीन मुलगी प्रसाधनगृहात जात असताना बळजबरीने पाठोपाठ शिरून वसंत गांगोडेने दरवाजाची कडी आतून बंद करीत अत्याचार केले. दुसरा आरोपी पीडितेच्या शाळेत शिक्षण घेत होता. त्याने पीडितेच्या घरात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे पीडिता गरोदर झाली. याबाबत कुठे वाच्यता केल्यास आरोपीने जिवे मारण्याची धमकी दिली. १० दिवसांनी आरोपीने पुन्हा असाच प्रकार केला. या प्रकरणी दोघांविरुध्द बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा