नाशिक : सुरगाणा तालुक्यात नदीत बुडाल्याने २२ वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी बाऱ्हे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सुरगाणा तालुक्यातील खिर्डी येथील महेश डोळे हा युवक पार नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. डोलारमाळ भागात त्याचा मृतदेह नदीपात्रात तरंगताना आढळला.

Story img Loader