नाशिक : जुन्या घराचे लाकडी छत अंगावर पडल्याने वृध्द कामगाराचा मृत्यू झाला. उपनगर येथे बांधकाम सुरू असताना हा प्रकार घडला. जेलरोड येथे अनमोल केडिया यांच्या बंगल्याचे बांधकाम सुरू आहे. मधुकर बोबडे (५९, रा. चांदशी) हे त्या ठिकाणी कामासाठी गेले होते. काम सुरू असताना सकाळी जुन्या घराचे लाकडी छत बोबडे यांच्या अंगावर पडले.
हेही वाचा : “मराठा आरक्षणाविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी शब्द पाळावा”, एकनाथ खडसे यांची मागणी
यामुळे बोबडे यांच्या डोक्याला, पोटाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.