नाशिक: दिंडोरी तालुक्यातील वणी परिसरात पारेगांव फाट्याजवळ खासगी प्रवासी वाहनाला अपघात होऊन एका मजुराचा मृत्यू तर, ३२ जण जखमी झाले. हे सर्वजण कांद्यांच्या चाळीवर कामाला जात होते. वणी परिसरात सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दह्याने (ता.चांदवड) येथील मजूर वणी येथे कांद्याच्या चाळीवर नेहमीप्रमाणे कामासाठी जात होते. वाहनात ३२ ते ३५ जण होते. पारेगांव फाट्यानजीक चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले.

परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव जखमींना बाहेर काढून मिळेल त्या वाहनाने वणी येथील ग्रामीण रुग्णालयाकडे रवाना केले. या अपघातात चंद्रभान हिंगले (५०) यांचा मृत्यू झाला. दह्याने येथील विलास भवर यांनी तरुणांच्या मदतीने जखमींना मदत केली. मोठ्या प्रमाणावर जखमी आल्याने वणी डाॅक्टर असोसिएशनचे अनिल पवार, अनिल शेळके, सोहम चांडोले या डाॅक्टरांनीही रुग्णालयात जाऊन जखमींवर उपचार केले.

Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
nashik vidhan sabha
नाशिक: एकाच दिवसात ३४९ गुन्हेगार हद्दपार
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
tempo hit on Satara road, Woman died Satara road,
सातारा रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू, दाम्पत्य जखमी; अपघातानंतर टेम्पोचालक पसार
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?

हेही वाचा : जळगावातील मतदान केंद्रात मतदार तहानलेलेच

गंभीर जखमींना नाशिक येथे हलविण्यात आले. २७ जणांना वणी ग्रामीण रुग्णालयात तर इतर पाच जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी नऊ जणांना नाशिक शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयात अनंत गाडेकर हे एकमेव डाॅक्टर होते. रुग्णालयातील दिवे बंद होते. वातानुकूलन कक्ष असूनही यंत्रणा बंद पडलेली होती. भ्रमणध्वनीच्या उजेडात उपचार करण्यात आले.