लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: नवीन नाशिक विभागात पंधरवड्यात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आणि सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्याप्रकरणी २९ जणांविरोधात कारवाई करून एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यात जैविक कचरा रस्त्यावर टाकल्याबद्दल जगताप नगर येथील विघ्नहर्ता क्लिनिकला २५ हजार रुपयांच्या दंडाचाही समावेश आहे.

Police Commissioner Amitesh Kumar has warned of action if high powered loudspeakers are used in ganesh immersion processions Pune new
विसर्जन मिरवणुकीत उच्चक्षमतेचे ध्वनीवर्धक वापरल्यास जप्त; ध्वनीवर्धक यंत्रणा पुरवठादार, ‘डीजें’ विरुद्ध कारवाईचा इशारा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Ayodhya Gang Rape News
Ayodhya Gang Rape : धक्कादायक! अयोध्येत राम मंदिर परिसराची स्वच्छता करणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार, पाच जणांना अटक
Action taken against by municipal corporation panel makers instead of ganesh mandal
गणेश मंडळांना अभय; फलक तयार करणाऱ्यांवर कारवाई
Pimpri, Notice to Engineers, Road Repair Works pimpri,
पिंपरी : रस्ते दुरुस्तीच्या कामांवर देखरेख ठेवणाऱ्या अभियंत्यांना नोटीस; काय आहे कारण?
136 artificial ponds for immersion build in navi mumbai
नवी मुंबईत यंदा १३६ कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती; जलप्रदूषण टाळण्याचे आयुक्तांचे आवाहन
Youth murder, hotspot, Hadapsar area,
पुणे : मोबाइलमधील हॉटस्पॉट यंत्रणेचा वापर करण्यास नकार दिल्याने तरुणाचा खून, हडपसर भागातील घटना
Upcoming Cars in September 2024
सप्टेंबरमध्ये मोठा धमाका! ग्राहकांनो, बाजारपेठेत दाखल होणार ‘या’ ५ नव्या कार; एकदा यादी पाहाच, टाटाचाही समावेश

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशान्वये शहरात प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले जात आहेत. मनपाच्या सहाही विभागात कारवाई केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाते. जोडीला प्लास्टिकचा वापर न करण्याबाबत जनजागृतीही केली जात आहे. नवीन नाशिक विभागीय कार्यालयाने मंगळवारी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल एका दुकानदाराला पाच हजारांचा दंड केला. रस्त्यावर अस्वच्छता केल्याच्या नऊ प्रकरणात १,८०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. अशा एकूण १० प्रकरणात ६,८०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

हेही वाचा… लाच स्वीकारताना मंडळ अधिकाऱ्यास अटक

घनकचरा विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे यांच्या सुचनेनुसार विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिबंधीत प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध दंडात्मक कारवाईची मोहीम राबविली जात आहे. त्या अंतर्गत १५ दिवसात प्रतिबंधीत प्लास्टिकचा वापर आणि इतर अशा एकूण २९ प्रकरणात ९४ हजार ८०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी जैविक कचरा टाकल्यामुळे जगताप नगर येथील विघ्नहर्ता क्लिनिकला २५,००० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. वर्गीकरण न करता कचरा देणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सांडपाणी रस्त्यावर सोडणे, सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणे आदींवरून कारवाई करण्यात आली.