नाशिक: नव्या कायद्यांविरोधात सोमवारी संविधान सन्मान वकील समितीच्या वतीने जिल्हा न्यायालय प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्यात आले. नवे कायदे रद्द करुन जुने कायदे लागु करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले.

हेही वाचा : नवीन कायद्यांनुसार पहिल्याच दिवशी पंचवटी पोलीस ठाण्यात दोन गुन्ह्यांची नोंद

Kishore Darade, Nashik Teacher Constituency,
नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी
nashik two crimes
नवीन कायद्यांनुसार पहिल्याच दिवशी पंचवटी पोलीस ठाण्यात दोन गुन्ह्यांची नोंद
pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
uddhav thackeray pradnya satav kharge
काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी, ठाकरे गटाच्या ‘त्या’ पत्राला केराची टोपली?
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Shaun Pollock Statement on Suryakumar Yadav Catch
VIDEO: दक्षिण आफ्रिकेच्या माजी खेळाडूचं सूर्याच्या कॅचवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “बाऊंड्री कुशन हललं, पण…”

निवेदनात समितीने आपली भूमिका मांडली आहे. केंद्र सरकारने एक जुलैपासून लागू केलेल्या भारतीय नागरिक सुरक्षा संहिता ,भारतीय न्याय संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या कायद्यांची अंमलबजावणी करू नये, यासाठी आंदोलन करण्यात आले. हे कायदे भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर मर्यादा घालणारे असून पोलिसांना जास्त अधिकार देणारे आहेत. या कायद्यांमुळे न्याय प्रक्रियेत देखील गोंधळ निर्माण होणार आहे. त्यामुळे सदर कायद्यांना वकिलाचा विरोध आहे. नवीन फौजदारी कायदे अंमलात आणत बहुजन समाजाला गुलामीत ढकलण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायदे हे कधीही नवीन फौजदारी कायद्यांना मान्यता देणार नाही. भारतीय संविधानातील कलम २१ हे देखील अशा कायद्यांना मान्यता देणार नाही. अशा परिस्थितीत तीनही कायदे रद्द करत प्रचलित कायदे पूर्ववत करण्यात यावेत, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी बंडूनाना डांगे, प्रभाकर वायचळे, राम बागूल, नीलेश सोनवणे, रवी कांबळे, तातेराव जाधव आदी वकील उपस्थित होते.