नाशिक : दिंडोरीप्रणित अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ विश्वस्त मंडळाच्या कार्यकारी सदस्याला आक्षेपार्ह चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी स्वीकारणाऱ्या संशयित महिलेसह तिच्या मुलाला पोलिसांनी अटक केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. संशयित महिला स्वामी समर्थ केंद्रात उपासिका असल्याने केंद्राची तज्ज्ञ समितीव्दारे चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
हेही वाचा : “मराठा आरक्षणाविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी शब्द पाळावा”, एकनाथ खडसे यांची मागणी
निवेदनात अंनिसने भूमिका मांडली आहे. तक्रारदार आणि संशयित महिला दोघेही स्वामी समर्थ गुरुपीठाशी संबंधित आहेत. संबंधित महिलेने संकल्प सिद्धी नावाने कंपनीची स्थापना करून अनेक सेवेकऱ्यांकडून पैसे उकळल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार केंद्राच्या प्रमुखांना माहीत नाही, यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. अनेक वर्षांपासून श्रद्धाळू, भक्त, सेवेकरी यांना अध्यात्माच्या नावाने फसवून, त्यांचे कोट्यवधी रुपयाचे शोषण करण्यात आल्याचे या घटनेवरून उघड झाले आहे, असा दावाही अंनिसने केला आहे.