नाशिक : गुंडाविरोधी पथकाने भुसावळ येथील दुहेरी हत्येतील मुख्य संशयिताला दोन बंदुका, पाच काडतुसांसह २४ तासाच्या आत बेड्या ठोकल्या. भुसावळ शहरातील जुना सातारा भागात वाहनातून जाणारा भाजपचा माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ता सुनील राखुंडे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी नाशिकमध्ये भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत गुंडा विरोधी पथक गस्त घालत असताना हवालदार अक्षय गांगुर्डे यांना, भुसावळ येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील एक संशयित द्वारका परिसरात थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यावरून गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी द्वारका येथे पथकासह सापळा रचला. संशयित हा द्वारका येथील बोहरी पेट्रोलपंपाजवळ थांबलेला होता.
हेही वाचा…मनमाडकरांवर पाणी विकत घेण्याची वेळ, २० लिटर जारसाठी ४० रुपये दर
पोलिसांना पाहून तो पळू लागल्यावर पथकाने पाठलाग करुन करण पथरोड (२०, रा. भुसावळ) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन गावठी बंदूका, पाच काडतुसे असा ८४, ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
© The Indian Express (P) Ltd