नाशिक : येवला तालुक्यातील नगरसूल शिवारातील नांदगाव रस्त्यावरील मुळूबाई घाटात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीपैकी दोन संशयितांना येवला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी या कारवाईत २० लाखांहून अधिकचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. येवला- नांदगाव रस्त्यावरील मुळूबाई घाटावर तालुका पोलिसांच्या पथकाला काही लोक संशयास्पदरित्या फिरतांना आढळले. पथकाने रामा पवार (४०, रा. तेरखेडा पारधी वस्ती), शंकर पवार (२३, रा. खामकरवाडी), नितीन पवार (रा. लक्ष्मीपेडी पारधी वस्ती) आणि अन्य संशयितांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : नाशिक भाजप महिला आघाडीत १० उपाध्यक्ष, आठ चिटणीस, तीन सरचिटणीस; सर्वांच्या समाधानाचा प्रयत्न

यातील रामा आणि शंकर हे पोलिसांच्या हाती लागले. अन्य दोन संशयित पळून गेले. त्यांच्याकडे दरोड्याचे साहित्य, दरोड्यासाठी वापरण्यात येणारे वाहन असा २० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. येवला तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik at nagarsol 2 robber detained by the police css
Show comments