नाशिक : पाथर्डी फाटा परिसरातून दोन महिला व २२ वर्षीय युवक अशा तीन बांगलादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली. उपजिविकेसाठी ते दोन महिन्यांपूर्वी शहरात आले. संशयित महिला ब्युटी पार्लरमध्ये काम करीत होत्या. संबंधितांना सदनिका मिळवून देणाऱ्या मध्यस्तालाही अटक करण्यात आली आहे.

बांगलादेशातील अस्थिरतेमुळे ते्थून भारतात घुसखोरी वाढण्याची शक्यता व्यक्त होत असताना ही बाब समोर आल्यामुळे त्यास एकप्रकारे पुष्टी मिळत आहे. तीन बांगलादेशी नागरिक पाथर्डी गाव परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. या पथकाच्या कारवाईत दोन महिलांसह २२ वर्षीय युवकाला ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत संशयित दोन महिन्यांपूर्वी उपजिविकेसाठी शहरात दाखल झाल्याचे निष्पन्न झाले. दिंडोरी येथील जाधव नामक व्यक्तीने त्यांना मदत केली. पाथर्डी गाव परिसरात सदनिका उपलब्ध करीत करारनामा करून दिला. संशयित महिला याच भागातील ब्युटी पार्लरमध्ये काम करीत होत्या.

Article about obcs dominate government job recruitment
लोकजागर : ओबीसींची ‘सर्वोच्च’ अडवणूक!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Two women who stole on the pretext of begging arrested in ulhasnagar crime news
उल्हासनगर: भिक्षा मागण्याच्या बहाण्याने चोरी; सीसीटीव्हीच्या आधारे दोन महिलांना अटक
nashik banned nylon manja caused fatalities and power outages
नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार
In four cases of burglary in different parts of Nashik city more than 30 lakhs lost
नाशिक शहरात घरफोडीचे सत्र, ३० लाखहून अधिकचा ऐवज लंपास
Nagpur female missing
उपराजधानीतून वर्षभरात ५५९ मुली-महिला बेपत्ता, बेपत्तांमध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण जास्त
eps 95 pension scheme loksatta
ईपीएस-९५ वाढीव पेन्शन धोक्यात, खासगी कंपन्यांचे असहकार्य
Haldi Kunku Gift Ideas for Womens in Budget
Makar Sankranti Gift Idea: सुवासिनींना यंदा हळदी-कुंकवासाठी ‘वाण’ काय द्यायचं? पाहा ‘या’ भन्नाट आयडिया; खर्च कमी आणि वस्तूही उपयोगी

हे ही वाचा… Kasara Ghat Accident: कसारा घाटात टँकर दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू

हे ही वाचा… नाशिक: रक्षाबंधनसाठी सुट्टीच्या दिवशीही टपाल कर्मचारी कामावर

बांगलादेशी नागरिकांना सदनिका उपलब्ध करणाऱ्या जाधव नामक व्यक्तीलाही अटक करण्यात आली. एटीएस पथकाने या संशयितांना इंदिरानगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. संशयित महिला ज्या ब्युटी पार्लरमध्ये काम करीत होत्या. त्या संचालकाशी चौकशी केली जाणार असल्याचे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे अधिकारी अशोक शरमाळे यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास इंदिरानगर पोलिसांकडून केला जाणार आहे.

Story img Loader