नाशिक : बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ताचा सहभाग असणाऱ्या पार्टीशी नाशिक भाजपचा कुठलाही संबंध नाही. जे त्यात सहभागी झाले, त्यांना ते आवडले नव्हते. संबंधित व्यक्ती तेव्हा भाजपचा पदाधिकारी नव्हती. मूळ विषयाला कलाटणी देण्यासाठी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी धादांत खोटे आरोप केले आहेत. आरोपीला पॅरोल देण्याची प्रक्रिया कारागृह संहितेनुसार पार पडते. कुठल्याही विषयाचा गृहमंत्र्यांशी संबंध जोडून राऊत हे प्रसार माध्यमात चमकण्यासाठी बिनबुडाचे आरोप करतात. नाशिकमध्ये त्यांचे येणे म्हणजे राजकारण व दरोडेखोरीसाठीच असते, अशा शब्दांत भाजपचे नेते लक्ष्मण सावजी, सहप्रवक्ता अजित चव्हाण यांनी राऊत यांच्यावर टिकास्त्र सोडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता समवेत शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केलेल्या पार्टीची एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. उपरोक्त पार्टी भाजप पदाधिकारी व्यंकटेश मोरेने आयोजित केली होती, असा आरोप करीत राऊत यांनी बॉम्बस्फोटातील आरोपीला कोणत्या गृहमंत्र्यांच्या स्वाक्षरीने पॅरोलवर सोडले गेले, याची चौकशी करण्याची मागणी केली होती. राऊतांचे आक्षेप भाजप पदाधिकाऱ्यांनी खोडून काढत प्रत्युत्तर दिले. राऊत हे वारंवार खोटे बोलून ते खरे असल्याचे भासवतात. त्यांच्यामुळे राजकारणाचा स्तर अतिशय खालावत आहे. नाशिकला बदनाम करण्याचे काम ते करतात. संपादक असणाऱ्या व्यक्तीला पॅरोलवर आरोपीला कसे सोडले जाते, याची माहिती कशी असू नये, असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला.

हेही वाचा : छगन भुजबळ यांना मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे

चुकीच्या गोष्टी सांगून ते संभ्रम निर्माण करतात. माध्यमांमध्ये चमकण्यासाठी दररोज ते हा उद्योग करीत आहेत. पॅरोलबाबत त्यांनी असाच खोटा आरोप केला. सलीम कुत्ताचा सहभाग असणाऱ्या पार्टीची चौकशी सुरू असून तपास यंत्रणेच्या हाती सबळ पुरावे आले आहेत. आरोपीसाठी कुणी पार्टी आयोजित केली. त्याच्यासोबत कुणी नाच केला, खाण्यापिण्याचे सामान, मद्य कुणी पुरवले याची सर्व माहिती पोलिसांकडे आहे. उपरोक्त प्रकरणात संशयितांना लवकरच बेड्या पडतील, असे सुतोवाच चव्हाण यांनी केले.

संजय राऊत यांनी त्या पार्टीशी भाजपचा संबंध जोडून बेजबाबदार विधान केले. राऊत यांनी गंगापूर रस्त्यावरील मॉडर्न कॅफे मनपा प्रशासनावर दबाव आणून पाडले होते. नाशिकमध्ये ते केवळ लुटण्यासाठी येतात. राजकारण व दरोडेखोरी इतकाच त्यांचा नाशिकला येण्याचा विषय असतो. असे आरोप सावजी यांनी केले.

हेही वाचा : वाहन अडवून लूटमार करणाऱ्या सहा जणांना अटक, तक्रारदारच संशयित

व्यंकटेश मोरेचे समर्थन ?

पार्टीवेळी व्यंकटेश मोरे हा भाजपमध्ये नव्हता. त्यालाही ती बाब पटली नव्हती. भाजप हा संस्कारीत पक्ष आहे. व्यक्तीद्वेष, व्यक्तीस्तोम भाजपचा विषय होऊ शकत नाही. खलत्व काढून पक्षाला व्यक्ती हवी असते. भाजपचा आहे तसा घ्यावा, हवा तसा घडवावा, हा मंत्र आहे. मागील दशकभरात स्थानिक पातळीवर पक्षाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. सर्व प्रकारचे लोक आले. महानगरपालिका ताब्यात आली. प्रवेशाबाबत एखादी गंभीर बाब असेल तर पक्ष विचार करतो. पण इतिहासातील घटना घेऊन वर्तमानात गरज नसताना वातावरण संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याकडे सावजी यांनी लक्ष वेधले. भाजपच्या माथाडी कामगार संघटनेचा शहराध्यक्ष असणाऱ्या मोरेची पार्टी प्रकरणात चौकशी झाली आहे. त्याच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून तो पक्षात असल्याबद्दल भाजप नेत्यांनी अप्रत्यक्षपणे त्याचे समर्थन केल्याचे पत्रकार परिषदेत दिसून आले.