नाशिक : कारागृहातून बाहेर पडलेल्या सराईत गुन्हेगाराची साथीदारांनी शरणपूर रस्ता भागात अलिशान मोटारीतून मिरवणूक काढली. यावेळी अर्वाच्च घोषणाबाजी, वाहनांचे कर्कश भोंगे वाजवत दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आले. सराईत गुन्हेगाराच्या स्वागताला गुन्हेगारी पार्श्वभूमीचे अनेक जण सहभागी झाल्याचे सांगितले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पावसामुळे नाशिक-पुणे बस सेवा विस्कळीत

या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मनाई आदेशाच्या उल्लंघनासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षद पाटणकर, गोपाल नागोरकर, शॉन मायकल, जॉय मायकल, रॉबिन्सन बत्तीसे, वैभव खंडारे, विकास नेपाळी, वेदांत चाळद (सर्व बेथलेनगर, शरणपूर, कॅनडा कॉर्नर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. यातील हर्षद पाटणकर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर शहर पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई केली होती. वर्षभर तो कारागृहात होता. कारागृहातून तो बाहेर आल्यानंतर साथीदारांनी मंगळवारी दुपारी अलिशान मोटारीतून त्याची मिरवणूक काढली. आरडाओरड केली. १० ते १५ दुचाकी आणि पायी बेथेलनगर ते आंबेडकर चौक, साधू वासवानी रस्ता तसेच शरणपूर परिसरात ही मिरवणूक काढली गेली. यावेळी वाहनांचे कर्कश भोंगे वाजविले गेले. संशयितांनी घोषणाबाजी केली. मिरवणुकीत सहभागी झालेले संशयित गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्यावर तडीपारीची कारवाई झाली आहे. या घटनाक्रमाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. याबाबत जमादार सुधीर पाटील यांनी तक्रार दिली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik celebration of goon after released from the jail creates terror on sharanpur road css