नाशिक: केंद्र स्तरावरून राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या शासकीय योजनांची स्थिती काय, याची चाचपणी करण्यासाठी माहिती संकलित करण्याकरिता केंद्रीय पातळीवरून समिती जिल्ह्यात दाखल झाली आहे. मंगळवारी कळवण, दिंडोरी परिसरात समितीने पाहणी केली असून बुधवारी ही समिती इगतपुरी, त्र्यंबकेश्वर येथे पाहणी करणार आहे.
हेही वाचा : नाशिक जिल्ह्यात १३०७ गाव-वाड्यांना टँकरने पाणी
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पंतप्रधान कार्यालयाला शासकीय योजनांचा आढावा अहवाल पाठविला होता. या अहवालाच्या धर्तीवर पंतप्रधान योजनेतंर्गत पंतप्रधान आवास योजना, उज्वला योजना, जलजीवन योजना यासह वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती किती नागरिकांपर्यंत पोहचली आहे, लाभार्थ्यांची संख्या, योजनांच्या अमलबजावणीत येणाऱ्या अडचणी याची माहिती संकलित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. यासंदर्भातील संपूर्ण अहवाल पंतप्रधान कार्यालयाकडे सादर करण्यासाठी समिती नाशिकमध्ये दाखल झाली आहे. बुधवारी समिती त्र्यंबकेश्वर, इगतपुरी परिसरातील अंगणवाडी, आरोग्य केंद्र यासह अन्य काही बाबींची पाहणी करणार आहे. समिती येणार असल्याने कळवण, दिंडोरी या दोन्ही ठिकाणी मंगळवारी अंगणवाडीची सजावट करण्यात आली होती.