नाशिक : मराठा समाजाला इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, या मागणीचा पुनरुच्चार करत भुजबळ किती जणांना पाडेल, हे तुम्हांला माहीत नाही, असा इशारा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. ओबीसींसाठी ३५ वर्ष लढलो आणि यापुढेही लढणार आहे, असा निर्धारही त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इगतपुरी तालुक्यातील मोडाळे, शिरसाठे, कुशेगाव येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित सभेत भुजबळ यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना लक्ष्य केले. फुले, शाहू, आंबेडकर यांना जपणारे शाहू महाराज बघा आणि तुम्ही काय करता ते बघा, अशी टीकाही भुजबळ यांनी संभाजीराजे भोसले यांचे नाव न घेता केली.

हेही वाचा : तरुणाचे गुडघ्यावर चालण्याचे कारण काय? अमळनेर येथील प्रकार

आपणास आमदार, मंत्रिपदाची पर्वा नाही. आपल्याकडे आलेल्या कोणालाही आजपर्यंत जात विचारली नाही. आपणासही कधी कोणी जात विचारली नाही. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नका. कारण, आधीच तुटपुंजे आरक्षण असून त्याचे अजून तुकडे होतील. त्यामुळे मराठा समाजाला कायद्याप्रमाणे आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. आंतरवली सराटीमध्ये आधी पोलिसांवर अत्याचार झाले ते नाही दिसलं का तुम्हाला ? त्यानंतर बीडमध्ये आमदारांची घरे जाळली, हॉटेल जाळले, हे लोकांपर्यंत गेले नाही. त्यामुळे सत्य परिस्थिती दाखवली पाहिजे. आपण ३७४ जातींचे प्रतिनिधित्व करत असून सर्व ओबीसींचे नेतृत्व करत आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.

हेही वाचा : नाशिक : विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू

टायर जाळून भुजबळ यांचा निषेध

इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथील कार्यक्रमानंतर भुजबळ यांचा ताफा नाशिककडे जात असतांना वाडीवऱ्हेजवळ काही जणांनी रस्त्यावर टायर जाळून निषेध केला. तसेच सांजेगाव आणि भंबाळे फाट्यावर मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर जमा होत भुजबळ यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik chhagan bhujbal asked do you know how many people bhujbal will lose css