नाशिक : शहराजवळील गंगापूर गाव परिसरात साकारत असलेल्या कलाग्रामच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या उत्पादनास विक्रीसाठी हक्काचे दालन उपलब्ध करून देणार असून दोन ते तीन महिन्यात कलाग्रामचे काम पूर्ण करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. येथील पंचायत समितीच्या आवारात आयोजित उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत रानभाज्या आणि राखी महोत्सवास दिलेल्या भेटीप्रसंगी मंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, गटविकास अधिकारी सोनिया नाकाडे आदी उपस्थित होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in