नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आचारसंहितेचा भंग वा तत्सम गैरप्रकारांविषयी तक्रार करण्यासाठी उपलब्ध केलेल्या सि – व्हिजिल ॲपवर तक्रारी येण्यास सुरूवात झाली आहे. खासदार, आमदार, राजकीय पक्ष यांच्याविषयी तक्रारी करण्यात येत आहेत. आचारसंहितेविषयी नागरिकांमध्ये असलेली सजगता त्याद्वारे दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणुकीचा गाभा असलेल्या प्रचारात निवडणूक आयोगाकडून गैरप्रकार रोखण्यासाठी आचारसंहिता ठरवून देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने ठिकठिकाणी राजकीय पक्षांचे फलक झाकण्यासह इतर कार्यवाही करण्यात येते. मात्र तरीही राजकीय पक्षांकडून छुप्या पध्दतीने प्रचाराचा प्रयत्न केला जातो. अशा गैरप्रकारांवर निवडणूक आयोगाची भरारी पथके लक्ष ठेवून असतात. गैरप्रकार रोखण्यासाठी नागरिकांनीही निवडणूक आयोगास सहकार्य करावे, यासाठी नागरिकांना तक्रार करण्यासाठी आयोगाने सि व्हिजिल ॲपची सुविधा उपलब्ध केली आहे.

हेही वाचा…VIDEO: नाशिक रोड स्थानकाजवळ गोदान एक्स्प्रेसच्या मालडब्याला आग

नागरिक आक्षेपार्ह छायाचित्र, चित्रफित या ॲपवर पाठवून त्याची तक्रार नोंदवू शकतात. या तक्रारीवर भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाई केली जाते. त्यासाठी १०० मिनिटांच्या आत तक्रारी निकाली काढण्याचे सूचित करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात यासाठी खास भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातील आचारसंहिता भंगची पहिली तक्रार या ॲपवर दाखल झाली.

हेही वाचा…दुचाकी चोरट्यांची भन्नाट शक्कल, चोरी जळगावात अन विक्री…

रवीशंकर मार्गावरील कुर्डुकरनगर भागात उभ्या असणाऱ्या वाहनावर भाजपचे कमळ हे चिन्ह व झेंडा असल्याची पहिली तक्रार सि व्हिजिल ॲपवर करण्यात आली होती. गुरूवारी आचारसंहिता भंगाच्या एका तक्रारीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून खासदार हेमंत गोडसे यांनी उदघाटन केलेल्या रस्त्याच्या बाजूला असणारा ‘ग्रीन बोर्ड’ झाकण्यात आला नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय अबकी बार भाजप सरकार असा मजकूर असलेला फलक झाकला नसल्याची, सिन्नर तालुक्यात गोणपाटाने झाकलेला शिवसेनेचा फलक उघडा असल्याची तक्रार देखील प्राप्त झाली. त्यावर तत्काळ कार्यवाही करण्यात आली.