नाशिक : महानगरपालिकेच्या सर्वच शाळांमध्ये आगामी शैक्षणिक वर्षापासून शिक्षकांना एकच पोषाख संहिता लागू करण्याची तयारी शिक्षण मंडळाने केली आहे. त्या अंतर्गत महिला शिक्षकांसाठी परस्पर विशिष्ट साडीची निवड केली गेली तर, पुरुषांना मात्र वगळण्यात आल्याची तक्रार आहे. पोषाख संहितेला शिक्षक वर्गातून विरोध होत असताना शिक्षण मंडळाने नव्या पोषाखाचा भार महिला शिक्षकांवर टाकून प्रतीसाडी एक हजार रुपये संकलित करण्यास सुरुवात केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दुसरीकडे, शिक्षण विभागाने आपल्यावरील आक्षेप फेटाळले आहेत.

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील शिक्षकांसाठी पोषाख संहिता (ड्रेसकोड) लागू करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने मध्यंतरी दिले होते. महिला शिक्षकांनी साडी, चुडीदार-सलवार, कुर्ता, दुपट्टा अशा पद्धतीने, तर पुरुष शिक्षकांनी शर्ट, ट्राउझर पँट, शर्ट इन करून पेहराव करावा, असे सुचवले. शाळेने शिक्षकांसाठी एकच पोशाख संहिता, परिधान करायच्या पेहरावाचा रंग निश्चित करावा, पेहरावाला शोभतील, अशी पादत्राणे असावीत, स्काऊट गाईडच्या शिक्षकांना स्काऊट गाईडचाच पेहराव असेल, असे शिक्षण विभागाने म्हटले आहे. या निर्णयाचा संदर्भ देत मनपाचे शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी सर्व शाळेतील शिक्षकांना एकच पोषाख संहिता लागू करण्याचे ठरवले आहे.

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11 thousand 500 students passed ca final examination conducted in November 2024 Mumbai
‘सीए’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ११ हजार ५०० विद्यार्थी ‘सीए’ म्हणून पात्र
Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
students failed in 5th and 8th standard in maharashtra
राज्यात पाचवी, आठवीचे किती विद्यार्थी अनुत्तीर्ण?
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
Nagpur Mahanagarapalika Bharti 2025: total 245 vacancy available for these posts Nagpur Mahanagarpalika Bharti Form Apply
नागपूर महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; १ लाख २२ हजारांपर्यंत मिळणार पगार; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?

हेही वाचा : आचारसंहितेत नाशिक जिल्ह्यात साडेपाच कोटीचा मद्यसाठा, अमली पदार्थ जप्त

मनपाच्या शहरात ८८ प्राथमिक आणि १२ माध्यमिक शाळा असून तिथे एक हजारहून अधिक शिक्षक कार्यरत आहेत. शाळानिहाय पोषाख संहिता आधीपासून अस्तित्वात आहे. पण आता मनपाच्या सर्व शाळेत एकच पोषाख संहिता लागू केली जात आहे. त्यास शिक्षक वर्गातून विरोध झाला. पण, दबावामुळे महिला शिक्षकांना त्यासाठी तयार करण्यात आले. शिक्षण मंडळाने पोषाख निवडीविषयी महिला शिक्षकांशी चर्चा केली होती. प्रातिनिधीक स्वरुपात काहींना साडीचा रंग व तत्सम बाबींची निवड करण्यास सांगितले गेले. ही प्रक्रिया प्रगतीपथावर असताना मंडळाने परस्पर साडीची निवड केली. साडीची निवड करण्यासाठी धावपळ करणाऱ्या शिक्षकांना विश्वासात न घेता साडीचा व्यवसाय असणाऱ्या परिचिताकडून या साड्या खरेदी केल्या जात असल्याची तक्रार होत आहे. याकरिता प्रतिसाडी एक हजार रुपये महिला शिक्षकांकडून संकलित केले जात आहेत. पोषाख संहितेचा भार शिक्षकांवर पडला आहे. महिलांच्या गणवेशासाठी आग्रही भूमिका घेणाऱ्या शिक्षण मंडळाने पुरुष शिक्षकांना मात्र कुठलाही पेहराव निश्चित केलेला नाही. त्यांची ना बैठक झाली, ना काही पोषाख निश्चित झाला. पोषाख संहितेची केवळ महिला शिक्षिकांवर सक्ती का, आर्थिक भुर्दंड आम्ही का सोसायचा, असे प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचा : रक्षा खडसे यांच्यावर एकनाथ खडसे यांचे २३ लाखांचे कर्ज, मालमत्तेत साडेसात कोटींनी वाढ

तक्रारी तथ्यहीन

मनपा शाळेतील पुरुष शिक्षकांसाठी आधीच काळ्या रंगाची पॅन्ट आणि पांढरा शर्ट ही पोषाख संहिता निश्चित झाली आहे. महिला शिक्षकांनी त्यांच्यासाठी साडी निवडली असून अद्याप ती अंतिम झालेली नाही. स्वखर्चाने त्यांना ती खरेदी करायची आहे. त्यासाठी पैसे संकलित केले जात नाहीत. त्यांना योग्य वाटेल तिथून ते खरेदी करू शकतात. साडीची निवड करण्यासाठी समिती स्थापन झालेली नव्हती. महिला शिक्षकांनी एकमत करावे आणि त्यांच्या पातळीवर निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली. शिक्षण मंडळाच्या पातळीवर यासंदर्भात निर्णय होणार नाही. कुणीतरी या विषयात चुकीची माहिती देत आहे. मनपा शाळेत व्यवस्थितपणा असावा, हा संहितेचा उद्देश आहे. महिला शिक्षिकांना ही संहिता नको असल्यास शिक्षण मंडळाचे काही म्हणणे नाही. मात्र, शासन निर्णयाचे उल्लंघन होईल.

बी. टी. पाटील (शिक्षणाधिकारी, नाशिक महानगरपालिका)

Story img Loader