नाशिक : शहर काँग्रेस सेवादलाच्या वतीने रामकुंड परिसरातील गांधी ज्योतसमोर नथुराम गोडसे यांच्या उदात्तीकरणाचा निषेध करण्यासाठी मूक सत्याग्रह करण्यात आला. काही संघटना जाणीवपूर्वक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून ते या माध्यमातून नथुराम गोडसेच्या उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे.
हेही वाचा…स्वच्छतेसाठी पालकमंत्री दादा भुसे उतरले नदीपात्रात
राष्ट्रपिता महात्मा गांधींनी संपूर्ण जगाला अहिंसेचा व मानवतेचा संदेश देण्याचे काम केले. असे असताना जाणीवपूर्वक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा विशिष्ट संघटना काम करत असल्याचे काँग्रेस सेवादलाने म्हटले आहे. गोडसेच्या उदात्तीकरणासाठी यात्रा काढली जात आहे. हे मानवतेला व देशहिताला घातक असून, अशा प्रवृत्तींना देवाने सदबुद्धी द्यावी, यासाठी प्रार्थना केल्याचेही म्हटले आहे. या आंदोलनता काँग्रेस सेवादलाचे डॉ. वसंत ठाकूर, प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र बागूल, लक्ष्मण धोत्रे, महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती जाधव आदी उपस्थित होते.