नाशिक: पडीक असलेल्या जागेची तात्पुरती बिनशेती परवानगी मिळवून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारतांना येवला नगरपालिकेच्या नगरविकास विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. तक्रारदारांची येवला येथे समाजाची जागा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : नाशिक महापालिकेची सिटीलिंक बससेवा पावणेदोन वर्षात १० वेळा ठप्प; पगार वाढीसाठी चालक संपावर, हजारो विद्यार्थी, प्रवासी वेठीस

या जागेसाठी बिनशेतीची परवानगी मुख्याधिकारी व लिपीक यांच्याकडून मिळवून देण्यासाठी कंत्राटी कर्मचारी आकाश गायकवाड (२२, रा. गवंडगाव) याने अगोदर १० हजार रुपये घेतले. शुक्रवारी रात्री पुन्हा २० हजार रुपये मागितले. ही लाच स्वीकारताना त्याला पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील राजपूत व अन्य सहकाऱ्यांनी सापळा रचत ही कारवाई केली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik contract basis employee arrested while accepting bribe of rupees 20 thousand at yeola css