नाशिक : तब्बल ९०९ कोटींच्या तोट्यात सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्याची प्रक्रिया थांबविण्यासाठी जिल्हा बँकेने सर्वंकष आराखडा तयार करावा आणि राज्य सरकारने भाग भांडवलाबाबत हमी देऊन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत. बँकेला नाबार्डने बँकिंग परवाना रद्द करण्याबाबत सूचित करण्याविषयीची अंतिम नोटीस पाठवली आहे. या पार्श्वभूमीवर, सत्ताधाऱ्यांनी बँकेवर कारवाई होऊ नये म्हणून धडपड सुरू केली आहे. निश्चलनीकरणापासून जिल्हा बँक अडचणीत सापडली आहे. बँकेच्या समस्यांवर मंत्रालयातील सहकार मंत्र्यांच्या दालनात बैठक पार पडली यावेळी पालकमंत्री दादा भुसे, राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यासह सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अडचणीत असलेल्या नाशिक जिल्हा सहकारी बँकेला वाचवायचे असेल तर सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे मोठ्या कर्जदारांकडून सक्तीने कर्ज वसुली करणे गरजेचे असल्याचे मत भुजबळ यांनी व्यक्त केले. नाशिक जिल्हा सहकारी बँक ही देशातील एकवेळची नावाजलेली बँक होती. या बँकेचे आजही ११ लाख वैयक्तिक ठेवीदार आहेत. तसेच एक हजारापेक्षा जास्त संस्थात्मक ठेवी आहेत. एकेकाळी बँकेचा पत आराखड्यामध्ये दुसरा क्रमांक लागायचा. मात्र मधल्या काही काळात या बँकेची स्थिती बिघडली.

PMC Bank Scam Hearing on petitions of aggrieved account holders on December 12 mumbai news
पीएमसी बँक घोटाळा; पीडित खातेधारकांच्या याचिकांवर १२ डिसेंबरला सुनावणी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Loans from State Bank, HDFC,
एचडीएफसी पाठोपाठ स्टेट बँकेकडून कर्ज महाग
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
Use UPI without Bank account NPCI launches new feature UPI Circle for family members and friends
आता बँक खाते नसलेला व्यक्ती करू शकतो UPIचा वापर; NPCIने कुटुंबातील सदस्यांसाठी सुरू केलं UPI Circle, जाणून घ्या नव्या फीचरबद्दल…
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…

हेही वाचा : बक्षिसाचे आमिष दाखवित वृध्दाची फसवणूक

सध्या ही बँक ९०९ कोटींच्या तोट्यात आहे. नाबार्डने बँकेला बँकिंग परवाना रद्द करण्याबाबत अंतिम नोटीस पाठवली आहे. त्यामुळे बँकेची भांडवल पर्याप्तता वाढविणे गरजचे असल्याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले. बँकेवर किमान पुढील पाच वर्ष तरी प्रशासकाची नेमणूक कायम ठेवावी आणि कर्जदारांना एकरकमी परतफेड करता यावी यासाठी खास योजना राबविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे भुजबळ यांनी मांडले.

हेही वाचा : कांदा निर्यात शुल्काचा फेरविचार करा, पियुष गोयल यांना साकडे

सहकारमंत्री वळसे यांनी बँकिंग परवाना रद्द करण्याची प्रक्रिया थांबविण्यासाठी जिल्हा बँकेला सर्वंकष आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. राज्य सरकारने भाग भांडवलाबाबत हमी देऊन हा प्रस्ताव नाबार्डला सादर करावा, असे सूचित करण्यात आले. बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खा. हेमंत गोडसे, आ. हिरामण खोसकर तसेच सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, विभागीय सहनिबंधक संतोष पाटील, नाबार्डचे महाप्रबंधक रश्मी दरक, नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे प्रशासक प्रताप चव्हाण उपस्थित होते.