नाशिक : संततधार पावसात शनिवारी सकाळी कसारा घाटातील रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक-मुंबई रेल्वे मार्गावरील हा मार्ग असून त्यावरील वाहतूक दुसऱ्या मार्गावर वळविण्यात आली आहे. रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले असून लवकरच दगड व मातीचा भराव हटवला जाईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. कसारा घाटातील अन्य दोन मार्गावरील वाहतूक सुरळीत आहे.

मागील काही दिवसांपासून इगतपुरी व कसारा भागात संततधार सुरू आहे. मध्यरात्रीपासून पावसाने चांगलाच जोर पकडला. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या घाटातील रेल्वे मार्गावर ही घटना घडली. बोगद्याबाहेर एका रेल्वेमार्गावर दगड आणि मातीचा भराव आल्याचे गस्ती पथकाला लक्षात आले. त्यांनी तातडीने रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती दिली. काही वेळात रेल्वेचे पथक घटनास्थळी रवाना करण्यात आल्याचे रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त

हेही वाचा : ..तर योजना बंद होणार नाहीत, सुरगाण्यातील शेतकरी मेळाव्यात अजित पवार यांचे आश्वासन

काही दगड व मातीचा भराव रेल्वे मार्गावर आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली. कसारा घाटात एकूण तीन रेल्वे मार्ग आहेत. उर्वरित दोन मार्गांवर कुठलाही परिणाम झालेला नाही. नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या रेल्वेगाड्या घाटातील मधल्या मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. रेल्वेचे पथक माती हटविण्याचे काम करीत आहे. हे काम झाल्यानंतर रेल्वे मार्गाचे काही नुकसान झाले आहे का, याची पडताळणी केली जाईल. नंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.