नाशिक: काही दिवसांपासून दोन धर्मात तेढ निर्माण होईल असे काही आक्षेपार्ह संदेश, दृकश्राव्य चित्रफिती समाजमाध्यमात टाकून सामाजिक शांतता बिघडविण्याचे काम सुरू आहे. काही समाजकंटकांकडून हे प्रकार होत असल्याने सायबर पोलीस याकडे लक्ष ठेवून असून संशयितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणूक निकालानंतर अशा प्रकारांमध्ये अधिक वाढ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : नाशिक जिल्ह्यात १३०७ गाव-वाड्यांना टँकरने पाणी

दोन धर्म तसेच जातींमध्ये तेढ निर्माण होवून त्यांच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने, सामाजिक सलोखा धोक्यात येईल, असे काही संदेश प्रसारित होत आहेत. नाशिक शहरात दोन भिन्न धर्माच्या प्रार्थनास्थळांसमोरील दृश्यांमध्ये तांत्रिक बदल करुन खोट्या दृकश्राव्य चित्रफिती समाजमाध्यमात टाकणे, भावना भडकविणारे संदेश प्रसारित केले जात आहेत. अशा संशयितांविरूध्द सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाज माध्यमात अशा पध्दतीने संदेश टाकणाऱ्यांविरुध्द कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी समाज माध्यमात संदेश टाकतांना खबरदारी घ्यावी, असे आवाहन नाशिक पोलिसांनी केले आहे.