नाशिक : मालेगाव येथील सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यानुसार २०० खाटांचे रुग्णालय आता ३०० खाटांचे होणार आहे. विशेष बाब म्हणून शासनाने सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यास मान्यता दिली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. सामान्य रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनामुळे मालेगावकरांना उत्तम आरोग्य सेवा-सुविधांचा लाभ होणार आहे.
हेही वाचा : मराठा आंदोलनाची जायकवाडीच्या विसर्गाला झळ; काही धरणांची संयुक्त पाहणी रखडली
हेही वाचा : नाशिक जिल्ह्यात हजार पुरुषांमागे ९१४ स्त्री मतदार; संख्या वाढविण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन
तसेच मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील ग्रामीण रुग्णालयात २० खाटांचे ट्रामा केअर केंद्र स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. श्रेणीवर्धीत सामान्य रुग्णालयाचे बांधकाम व पदनिर्मितीबाबत स्वतंत्र कार्यवाही करण्यात येणार आहे. दाभाडीच्या ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर केंद्रासाठी विहित पद्धतीने जागा अधिग्रहीत करून बांधकाम व पदनिर्मिती करणे, याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येणार असल्याचे शासनाने म्हटले आहे.