नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधकच्या नाशिक विभागाने २०२३ या वर्षात एकूण १६१ सापळे रचून २३५ लोकसेवकांवर कारवाई केली आहे. नाशिक जिल्ह्यात ६२, अहमदनगर ३४, धुळे १८, नंदुरबार १५ आणि जळगाव ३२ याप्रमाणे सापळे रचण्यात आले. वर्षभरात महसूल विभागात ३५, पोलीस ३०, जिल्हा परिषद १५, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी १०, सहकार आठ, पंचायत समिती सात, भूमीअभिलेख सात, याप्रमाणे विविध विभागातील कारवाईची संख्या आहे. महत्वाच्या सापळ्यांमध्ये भूमी अभिलेखमधील जिल्हा अधीक्षक महेश शिंदे आणि लिपिकास ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना केलेली कारवाई, सिन्नरचा सहायक निबंधक रणजित पाटील, लिपिक वीरनारायण यांना २० लाख रुपयांची लाच स्वीकारताना झालेली अटक, शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना ५५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक, यांचा उल्लेख करावा लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : नाशिक जिल्ह्यातील इंधन, गॅस वाहतूकदारांचा संप; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील इंधन पुरवठा ठप्प

पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत आणि पथकाने नगर भागात विद्युत महामंडळाचा सहायक अभियंता अमित गायकवाड आणि तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ यांना एक कोटीची लाच स्वीकारतांना अटक केली. संपूर्ण वर्षात दोन कोटी, १५ लाख, नऊ हजार ३६ रुपये लाच स्वीकारताना जप्त करण्यात आले. सुनीता धनगर यांच्यावर कारवाई केल्यानंतर तपासात उघड चौकशीत त्यांच्यावर अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच नगर जिल्ह्यात एक आणि नाशिक येथील माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.