नाशिक : गोदावरीत सातत्याने गटारींचे पाणी सोडले जात असतानाही त्याविषयी कोणतीच कारवाई केली जात नसल्याचा विषय येथे आयोजित त्रैमासिक आढावा बैठकीत उपस्थित झाल्यावर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी महापालिका प्रशासनावर कारवाई करण्याचे आदेश दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात गोदावरी नदी प्रदुषण नियंत्रणविषयक त्रैमासिक आढावा बैठक गुरूवारी विभागीय आयुक्त गमे यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीस जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्यासह महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी आदी उपस्थित होते.

महापालिका प्रशासनाच्या वतीने गोदाकाठ तसेच अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत असल्याबद्दल गोदा प्रदुषण विरोधात सामाजिक कार्यकर्ते निशिकांत पगारे यांनी याचिका सादर केली होती. या बैठकीत पगारे यांनी आपली भूमिका मांडली. गोदावरी नदीत प्रदूषण केले जाते म्हणून सर्वसामान्यांवर कारवाई केली जाते. परंतु, गोदावरी नदीत सातत्याने सांडपाण्याच्या गटारी सोडून नदीत प्रदूषण करणाऱ्या नाशिक महापालिकेवर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. याबाबत विभागीय आयुक्त गमे यांनी महापालिका प्रशासनावर कारवाई करा, अशी सूचना केली.

Navi Mumbai Municipal Corporation Encroachment Department takes action against illegal constructions in Nerul and Ghansoli
नेरुळ, घणसोलीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई; महापालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष करून बांधकामे
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
man arrested with 13 kg of charas and weapons by powai police
मुंबईतून अमलीपदार्थ आणि शस्त्रांचा साठा जप्त; साडेतीन कोटींच्या मुद्देमालासह पवईतून एकाला अटक
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
deportation action against criminals is on paper only
पुणे : तडीपारीची कारवाई कागदावरच; तडीपार गुन्हेगारांचा सर्रासपणे शहरात वावर
fake police verification certificate, Anti-Terrorism Branch action, fake police verification certificate maker,
सावधान..! बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
anti-ragging rules, non-compliance of anti-ragging rules, National Medical Commission,
रॅगिंगविरोधी नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा वैद्यकीय महाविद्यालयांना इशारा

हेही वाचा : एपीएमसीत टोमॅटोच्या दरात प्रतिकिलो १२-१४ रुपयांनी घसरण

जिल्हा परिषदेने पानवेलींपासून घरगुती उपयोगाच्या वस्तू बनविण्याची कार्यशाळा आयोजित करुन महिलांना प्रशिक्षण दिले असून सदरचा उपक्रम स्तुत्य असल्याचे गमे यांनी सांगितले. प्रशिक्षित महिलांनी गोदावरी नदीतील पानवेलींपासून बहुपयोगी वस्तु तयार केल्या आहेत. या वस्तूंना फॅब इंडिया, अमेझॉनसारखे व्यावसायिक दालन उपलब्ध करुन देण्याची सूचनाही गमे यांनी केली. जिल्हा परिषदेप्रमाणे महानगरपालिकेने देखील त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या बचत गटांना पानवेलींपासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षणाबरोबरच प्रशिक्षणात कार्यालयीन कामकाजात आवश्यक असणारे साहित्य बनविण्याचे देखील शिकवावे, जीईएम पोर्टलवर देखील या बचत गटांची नोंद करावी, जेणेकरुन त्यांना विक्रीसाठी व्यासपीठ मिळेल, असे गमे यांनी सांगितले. गणेशोत्सवातील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षणासाठी गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन करुन यावेळी समितीसमोर आलेल्या तक्रारींचे निरसन करण्यात आले.

Story img Loader