नाशिक : बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या ४८ वर्षांच्या व्यक्तीला तीन संशयितांनी दमदाटी करत त्यांच्याकडील एक लाख रुपये हिसकावल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी तीन संशयितांविरूध्द नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुशाल बेंडकोळी (रा. वेळे) यांची शेती आहे. शेतीतील कमाईतून आलेले एक लाख रुपये एका खासगी बँकेच्या खात्यात जमा करण्यासाठी बेंडकोळी दुचाकीने गिरणारे येथे जात होते. ते रस्त्यात एका ठिकाणी थांबले असता पाठीमागून दुचाकीवर तीन युवक आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : घरफोड्यांतून कमावले अन्‌ निवडणुकीत गमावले; जळगाव जिल्ह्यातील पराभूत उमेदवाराचा प्रताप, २० गुन्ह्यांची कबुली

त्यातील एकाने बेंडकोळी यांच्याकडे तंबाखु मागितली. तंबाखु देण्यासाठी त्यांनी हात पुढे केला असता अन्य दोन संशयितांनी त्यांचे हात पकडत एकाने त्यांच्या खिशातील एक लाख रुपये काढून घेतले. पैसे काढून त्यांना मातीच्या ढिगाऱ्यावर ढकलून दिले. संशयित बेंडकोळी यांची दुचाकी आणि एक लाख रुपये घेऊन हरसूलच्या दिशेने पळून गेले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik farmer who was going to deposit money in bank robbed of rupees 1 lakh by 3 persons css