नाशिक: घरात कोणी नसल्याचे पाहून पित्याने मुलीवर अत्याचार केला. याबाबत पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोस्को कायद्यानुसार संशयितावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. मुलगी घराबाहेर भांडे घासत होती. संशयित घरात टीव्ही पाहत होता. मुलीच्या आईने किराणा आणण्यासाठी पतीकडून २०० रुपये घेतले. दोन लहान मुलींना घेऊन ती दुकानात गेली असताना हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा : नाशिक: पूर्ववैमनस्यातून गुंडाची हत्या, सहा जण ताब्यात

संशयिताने भांडे घासत असणाऱ्या मुलीला घरात बोलावून दरवाजाची कडी लावून घेतली. चाकूचा धाक दाखवत अत्याचार केला. आईला काही सांगितल्यास तुझ्यासह आई आणि दोन्ही बहिणींना मारण्याची धमकी दिली. पीडितेने आई घरी आल्यानंतर काही वेळाने सर्व प्रकार कथन केला. त्यानंतर आईने पोलिसात धाव घेतली.

Story img Loader