नाशिक : एका प्रकरणाच्या चौकशीसाठी बोलावलेले दोन कुटुंबियाचे गट आनंदनगर पोलीस चौकीच्या आवारात परस्परांना भिडले. पोलिसांनाही न जुमानता गोंधळ घालणाऱ्या सहा जणांविरूध्द इंदिरानगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक उपनिरीक्षक महम्मद शेख यांनी तक्रार दिली. तानाजी डेमसे, विष्णु डेमसे, सागर डेमसे, रामदास डेमसे आणि अशोक डेमसे (सर्व रा. पाथर्डी गाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : सिटीलिंक बससेवेला पुन्हा ग्रहण; बोनस न मिळाल्याने सेवा ठप्प, नाशिककरांचे हाल

पाथर्डी गावातील डेमसे कुटूंबियांना एका प्रकरणातील चौकशीसाठी आनंदनगर येथील पोलीस चौकीत बोलविण्यात आले होते. वेगवेगळ्या कुटूंबातील सदस्य एकमेकांसमोर आल्याने त्यांच्यात बाचाबाची झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करूनही दोन्ही गटांनी जुमानले नाही. या कुटुंबातील सदस्यांनी चौकीच्या आवारातच गोंधळ घातला. हाणामारी केली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik fight between two families at the premises of anand nagar police station css