नाशिक : निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात परदेशी तसेच स्थलांतरीत पक्षी येण्यास सुरूवात झाली आहे. बदलते वातावरण, अभयारण्य परिसरात अन्न पदार्थाची असणारी मुबलकता पाहता दोन ते तीन वर्षांपासून गायब असलेले पक्षी दिसू लागले आहेत. यंदा पक्ष्यांची संख्या विक्रमी असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जिल्ह्यात थंडीची चादर लपेटण्यास सुरूवात झाली की तापमानाचा पारा खाली उतरु लागतो. थंडीची चाहूल देश, विदेशातून येणारे पक्षी देतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यात थंडीला सुरुवात झाली की, नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात देश, विदेशातील पक्षी, स्थलांतरीत पक्षी येण्यास सुरूवात होते. यंदा दिवाळीत थंडी हळूहळू जोर घेऊ लागली असताना नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट वाढण्यास सुरूवात झाली आहे. पूर्व सायबेरियामधून थापट्या, उत्तर युरोपमधून तलवार बदक, सायबेरियामधून कौंच, रशिया आणि युरोपमधून पट्ट कादंब, लडाख परिसरातून चक्रवाक, हिमालय आणि उत्तर युरोपमधून चक्रांग बदक आणि लालसरी, हिमालय परिसरातून नकटा, पूर्व युरोप आणि उत्तर आफ्रिका मधून नयनसरी बदक, इंग्लंडमधून दक्षिण आफ्रिकेकडे प्रवास करणारा लेसर व्हाईटथ्रोट, युरोपमधील मिशीवाला वटवट्या आणि गडवाल, युरोप आणि आशियातील समशितोष्ण प्रदेशात प्रजनन करणारा युरेशियन राईनेक, पूर्व सायबेरियातील युरेशियन विजन आदी पक्ष्यांचे आगमन झाले आहे.

हेही वाचा : “मराठा आरक्षणाविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी शब्द पाळावा”, एकनाथ खडसे यांची मागणी

याशिवाय, चतुरंग, सुरय, झोळीवाला, करकोचे, शराटी, तुतारी, गल, चिलखे, चमचा बदक, बगळे, चांदवा, कमळपक्षी, पाणकोंबडी, मुग्धबलाक, खंड्या, ससाणे, पाणबुडी हे पक्षी या अभयारण्यात बघायला मिळतात. जलाशयाजवळ गवतीमाळ असल्याने आणि मोठ्या प्रमाणात वृक्ष असल्याने अनेक प्रजातींचे लहान-मोठे स्थानिक, स्थलांतरित पक्ष्यांचा वावर दिसून येत आहे.

हेही वाचा : टंचाईमुळे व्हाॅल्व्हमधून गळणारे पाणी भरण्याची वेळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यातील वाकोदची स्थिती

दरम्यान, पक्षी पाहण्यासाठी अद्याप पर्यटकांची अपेक्षित गर्दी होत नसली तरी पर्यटकांना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी वनविभागाच्या वतीने आवश्यक सुविधा देण्यात येत आहेत. पक्षी निरीक्षणासाठी मनोरे, स्पोटिंग स्कोप अशा सुविधा उपलब्ध आहेत. वनविभागाकडून नेचर ट्रेलही सुधरवण्यात आल्याने पर्यटकांना पक्ष्यांना त्रास न होऊ देता अभयारण्यात फिरता येणार आहे.

हेही वाचा : भाजप मंत्र्याने मंचावरुन दिला ‘जय राष्ट्रवादी’चा नारा; नंतर केली सारवासारव

“देशात काही ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. याचा परिणाम पक्ष्यांच्या वास्तव्यावर झाला आहे. आपल्याकडे बऱ्यापैकी पाऊस झाल्याने पक्षी मोठ्या संख्येने येतील असा अंदाज आहे. धरण, तळे परिसरात मुबलक प्रमाणात पक्ष्यांसाठी खाद्य उपलब्ध आहे.” – प्रा. आनंद बोरा (पर्यावरण प्रेमी)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik foreign and migratory birds continue to arrive at nandur madhmeshwar bird sanctuary css
Show comments